शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

बुडीत क्षेत्राचे पोलीस बंदोबस्तात फेरमूल्यांकन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:35 IST

खोपडावासीयांच्या बुडीत क्षेत्रातील घरांचे फेरमूल्यांकन पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी उपोषणाच्या तिसºया दिवशी बुधवारी जि.प. सदस्य संजय घुलक्षे यांच्या नेतृत्वात सुमारे ६०० जणांचा समुदाय उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या कार्यालयात धडकला. त्यांना घेराव करण्यात आला.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी : कार्यालयावर ६०० खोपडावासी धडकले

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : खोपडावासीयांच्या बुडीत क्षेत्रातील घरांचे फेरमूल्यांकन पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी उपोषणाच्या तिसºया दिवशी बुधवारी जि.प. सदस्य संजय घुलक्षे यांच्या नेतृत्वात सुमारे ६०० जणांचा समुदाय उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या कार्यालयात धडकला. त्यांना घेराव करण्यात आला. तोडगा न निघाल्यास ३० मे पासून रखरखत्या उन्हात अन्नत्याग व त्यानंतर जलत्याग आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.सन २०१४ मध्ये चारघड नदीला आलेल्या महापुरात १०० कुटुंबे बाधित झाली होती, तर छकुली शिंदे ही चिमुरडी वाहत गेली. निम्न चारघड प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील घरांची मोजणी अधिकाऱ्यांमार्फत केली असता, तफावत आढळून आल्याने गावकरी विरोध करीत आहेत. या प्रकल्पाचे काम रखडल्यास अनेक घरांची पडझड व मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. २०११ च्या मूल्यांकनानुसार ज्यांना मोबदला हवा, त्यांना तातडीने मोबदला द्यावा. २०१६ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यांचे बांधकाम पडले, त्यांना जुन्याच पद्धतीने मोबदला द्यावा. कच्चे बांधकाम पाडून पक्के केले असल्यास त्याचे मोजमाप करून मूल्यांकन करावे. २०१६ मध्ये सुटलेल्या १४ घरांचा जीआरएम करून त्यांना मूल्यांकन देण्यात यावे. गावातील धार्मिक स्थळांना प्लॉट उपलब्ध करावे या मागण्यांसोबतच १७ ते १८ गावे सुजलाम् सुफलाम् करणाºया निम्न चारघड प्रकल्पाचे काम विनाविलंब सुरू करण्यात यावे, अशी मागणी मोर्चेकºयांनी केली.दरम्यान, उपोषण करीत असलेल्या सात ते आठ जणांची प्रकृती खालावली आहे. त्यांची वैद्यकीय अधिकाºयांमार्फत तपासणी करण्यात आली. बुधवारी वसुधा बोंडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या. यावेळी नीलेश चौधरी, हरिदास लुंगे, भारती इंगळे, नितीन लुंगे, मंगेश लांडे, सचिन वानखडे, शीला डरंगे, सविता वानखडे सविता वानखडे, रंजना लुंगे, रंजना चौधरी, रजनी काळे, प्रमिला लुंगे, शोभा लुंगे, माधुरी कुरवाळे, गुंफा कुरवाळे आदी उपस्थित होते.