शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीची ‘टेक्सटाईल सिटी’ म्हणून ओळख

By admin | Updated: April 30, 2016 23:57 IST

नांदगावपेठ येथील टेक्सटाईल पार्कमध्ये सियाराम कंपनीच्या गोल्डन फायबर युनिटचे भूमिपूजन मागील वर्षी झाले होते.

मुख्यमंत्री : शेतीवर आधारित उद्योगनिर्मितीवर विशेष भर अमरावती : नांदगावपेठ येथील टेक्सटाईल पार्कमध्ये सियाराम कंपनीच्या गोल्डन फायबर युनिटचे भूमिपूजन मागील वर्षी झाले होते. या कंपनीच्या युनिटचा आज शुभारंभ होत आहे. रेमंडसारखा उद्योग येथे आल्यामुळे अन्य मोठे उद्योगही येथे येण्यास उत्सूक आहेत. भविष्यात या परिसरात शेतीवर आधारित उद्योगांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होईल व येत्या चार वर्षांत अमरावतीची टेक्सटाईल सिटी म्हणून राज्यात ओळख निर्माण होईल, असा आशावाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते शनिवारी नांदगावपेठ येथील रेमंड कंपनीच्या मल्टिस्पेशालिटी टेक्सटाईल व गारमेंट निर्माण युनिटच्या पायाभरणीप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, रेमंड ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, आ. यशोमती ठाकूर, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. रमेश बुंदिले, आ. अनिल बोंडे, आ. आशिष देशमुख, महापौर चरणजितकौर नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, शाम इंडोफॅबचे शाम गुप्ता आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात 'मेक इन इंडिया' सप्ताहांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सामंजस्य करार झालेल्या रेमंड कंपनीचे आज एप्रिलमध्ये भूमिपूजन करतांना आनंद होत असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. उद्योगांच्या विकासासाठी शासनाने गतीमान पद्धतीने केलेल्या कामाची ही फलश्रृती आहे. पंचतारांकित एमआयडीसी क्षेत्रात उद्योग कंपन्यांचा कल वाढत असून आता उद्योगांना जागा कमी पडत आहे. विदर्भात १० वस्त्रोद्योग पार्क अमरावती : राज्य शासनाचे धोरण उद्योगांसाठी पूरक व सकारात्मक असल्याचे रेमंडच्या रुपाने दिसत आहे. मोठ्या वस्त्रोद्योगामुळे उद्योग विकासाचे छत्र निर्माण होऊन त्यामुळे वाहतूक, पॅकिंग, अन्य लघु उद्योजकांना लाभ मिळेल. राज्यातील १० वस्त्रोद्योग पार्क विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात स्थापन करणार. कापूस उत्पादक पट्ट्यातच वस्त्रोद्योग उभारणार जेणेकरून तेथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. उद्योग विभाग गतिमान झाला असून वस्त्रोद्योगामुळे कापसाची मूल्यवृद्धी होईल आणि हे खऱ्या अर्थाने टेक्सटाईल पार्कचे यश असेल, असे त्यांनी सांगितले.रेमंड लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी यावेळी महाराष्ट्रात ८ ठिकाणी रेमंडचे युनिट असून १० हजारांहून जास्त लोकांना रोजगार रेमंडनी दिला आहे. विदर्भात यवतमाळ येथे १९९५ मध्ये सुरु केलेल्या डेनिम फॅब्रिक कंपनीने २५०० हून अधिक लोकांना रोजगार दिला असल्याचे सांगितले. नांदगाव पेठमधील या उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात १४०० कोटी रुपयांच्या भांडवल गुंतवणुकीसह ८ हजारांहून अधिक लोकांना रोजगार संधी उपलब्ध होतील व मार्चअखेर उत्पादन सुरू होईल, असे सांगितले. राज्य शासनाने गतिमान पद्धतीने केलेल्या कामामुळेच दोन महिन्यांत प्रकल्पाचे भूमिपूजन होऊ शकले. सर्वांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प यशस्वी होईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक रेमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी. गुप्ता, संचालन नीलिमा हावरे व आभार प्रदर्शन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.