शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांच्या आतील विकासकामांना मान्यता

By admin | Updated: May 30, 2015 00:39 IST

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार रजेवर गेले असल्याने नगरसेवकांनी सुचविलेली काही महत्त्वाची कामे होत ...

अतिमहत्त्वाच्या कामांना प्राधान्य : आयुक्तांच्या भ्रमणध्वनीवरुन अभियंत्यांना सूचनाअमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार रजेवर गेले असल्याने नगरसेवकांनी सुचविलेली काही महत्त्वाची कामे होत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे आता ५० हजारांच्यावर तर तीन लाखांच्या आतील कामे घेता येतील, अशा सूचना आयुक्तांनी अभियंत्यांना दिल्या आहेत. परिणामीे पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना वेग येईल.प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी आयुक्त गुडेवार यांनी काही अपहार, अतिक्रमण हटाव मोहीम, फौजदारी कारवाईचा सपाटा लावला आहे. परंतु विकासकामे ठप्प पडल्याची ओरड नगरसेवकांची होती. आवश्यक कामे करण्यासंदर्भात पत्र दिल्यानंतरही अभियंते त्या कामांचे दर करार केले जात नाहीत, असा आक्षेप घेत होते. आयुक्तांच्या आदेशाशिवाय कामांचे दर-करार करता येणार नाही, ही भूमिका अधिकारी, अभियंत्यांनी घेतली होती. त्यामुळे नगरसेवकांनी कामासंदर्भात पत्र दिले तरीही ते पत्र प्रलंबित राहिले. दरम्यान आयुक्त रजेवर गेल्याने नगरसेवकांनी कामे होत नसल्याची ओरड वाढविली होती. त्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.अतिमहत्त्वाची विकासकामे घेण्यास हरकत नाही. मात्र, ही कामे तीन लाखांच्या वरची असता कामा नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अभियंत्यांनी कामांची गरज लक्षात घेत इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ५० हजारांच्या वर तर तीन लाखांच्या आतील नगरसेवकांची कामे अभियंत्यांना घेता येतील. - चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका