शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावती घरपोहोच देताय? विमा कंपनीचे नव्हे, शेतकऱ्यांचे भले करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 23:51 IST

या अभियानात शेतकऱ्यांना विम्याची रक्कम विमा उतरविलेल्या पिकाचे प्रकार, विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र, विमा हप्त्याची रक्कम, आदी तपशिलाचा रेकाॅर्ड प्राप्त होईल. ही माहिती विमा दाव्याच्या प्रकरणी महत्त्वाची ठरणार आहे. पीक विमा योजनेतील उणिवा दूर करण्यासोबतच जागरूकता निर्माण करण्यास मदत होण्यास होणार आहे. याशिवाय योजनेविषयीचे गैरसमज दूर होणार आहे. अभियान १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत पीक विमा योजना व पुनर्रचित हवामानवर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये यंदा ‘मेरे पॉलिसी, मेरे हाथ’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची मूळ पावती घरपोहोच देण्यात येणार आहे. संकल्पना चांगली असली, तरी योजनेत कंपन्यांचे नव्हे तर शेतकऱ्यांचे हित जोपासा, अशी मागणी होत आहे.या अभियानात शेतकऱ्यांना विम्याची रक्कम विमा उतरविलेल्या पिकाचे प्रकार, विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र, विमा हप्त्याची रक्कम, आदी तपशिलाचा रेकाॅर्ड प्राप्त होईल. ही माहिती विमा दाव्याच्या प्रकरणी महत्त्वाची ठरणार आहे. पीक विमा योजनेतील उणिवा दूर करण्यासोबतच जागरूकता निर्माण करण्यास मदत होण्यास होणार आहे. याशिवाय योजनेविषयीचे गैरसमज दूर होणार आहे. अभियान १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 

२०२१ मध्ये १.८१ लाख अर्जसन २०२१मध्ये १,८१,०२७ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये ५५,६६१ शेतकऱ्यांना ३१.१० कोटींचा विमा देण्यात आला. फळपीक विमा योजनेत ५,५२१ व आंबिया बहरासाठी २,५६४ शेतकऱ्यांनी सहभाग होता.

यंदा २,१९,१०१ शेतकऱ्यांचा सहभागप्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदा २,१९,१०१ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सोयाबीन पिकासाठी सर्वाधिक १,१७,००३ शेतकरी सहभाग आहे.

५६ हजार शेतकऱ्यांना मिळाले ३४ कोटीगतवर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ५६,१६२ शेतकऱ्यांना ३५.२६ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. यामध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई ३,१३३ शेतकऱ्यांना मिळाल्याचे वास्तव आहे.

सर्वाधिक विमा सोयाबीनचायंदा पीक विमा योजनेमध्ये सर्वाधिक १,१७,००३ शेतकऱ्यांचा सहभाग सोयाबीन पिकासाठी आहे. याशिवाय तुरीसाठी ४१,९६८ व कपाशीसाठी १९,९९३ शेतकऱ्यांनी सहभागी आहे.

गतवर्षी पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारीगतवर्षी सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातुलनेत कंपन्यांनी विमा भरपाई न दिल्याने शेकडो तक्रारी दाखल झाल्या होत्या. 

विमा कंपन्यांचेच भले नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना कंपनीद्वारा ४० टक्क्यांपेक्षा कमी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येते. केवळ कंपन्यांचे चांगभल करण्यासाठी पीकविमा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतल्या जात नसल्याचा आरोप आहे.

काय आहे ‘माझी पॉलिसी, माझ्या हातात’?‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ हे विमा कंपन्यांद्वारा अभियान आहे. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी सहभाग घेतलेली मूळ पॉलिसी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

पीकविमा कंपनीद्वारा खरीप पीक व फळपीक विम्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना पीक विम्याची मूळ पॉलिसी देण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये जिल्हाभरात हे अभियान राबविले जाणार आहे.- अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा