लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आपल्या सर्वांना एक ते दीड वर्षे ‘कोरोना’सोबतच जगायचे आहे. त्यामुळे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगायला शिकले पाहिजे. वृत्तपत्रातून ‘कोरोना’ होतो, हा गैरसमज आहे. वृत्तपत्र वाचल्याने ‘कोरोना’चा कुठलाही धोका नाही. वृत्तपत्रांतून जनजागृतीचे आणि सुरक्षिततेसाठीच्या माहिती प्रसारणाचे काम होते आहे. मी स्वत: दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचूनच करतो, असे मत डॉ. प्रवीण बिजवे यांनी व्यक्त केले. डॉ. बिजवे हे एम.एस. असून जिल्ह्यातील अग्रणी 'सर्जन्स'पैकी एक आहेत.आपण सर्व जीवन जगत असताना आवश्यक दैनंदिन वस्तू खरेदी करतोच. नोटा हाताळतोच. घरात येणाऱ्या वस्तू, नोटा कशा पद्धतीने हाताळाव्यात, याचे ज्ञान आपल्याला वृत्तपत्रांतून मिळते. जगात, देशात व आपल्या शहरात काय घडामोडी घडत आहेत, त्यासंबंधिची पारखून घेतलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे वृत्तपत्र हेच आजघडीस प्रभावी माध्यम आहे. कोरोनासंदर्भात नाना संशोधने सुरू आहेत. त्याबाबतची रोज ताजी आणि विश्वसनीय माहिती वृत्तपत्रांतून मिळते. बिनधास्तपणे वृत्तपत्र वाचले पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात तर मी वृत्तपत्रांशी मैत्री केली. त्यातून ज्ञान मिळतेच, वेळेचा सदुपयोगही होतो. धकाधकीच्या काळात एरवी वाचनाला वेळ अपुरीच पडते. घरात बंद असलेल्या नागरिकांनाही वृत्तपत्रांविषयी गैरसमज दूर सारून त्यांच्याशी मैत्री करता येईल. वृत्तपत्र वाचल्यानंतर हात साबणाने धुवून घ्या. निश्चित ठिकाणी वृत्तपत्र आपण साठवून ठेवतोच. वाचून झाले की, निश्चित ठिकाणी ते ठेवून द्या. गैरसमजातून ज्ञानापासून वंचित राहण्यापेक्षा जागरूकपणे ज्ञान मिळविणे योग्यच!
वृत्तपत्र वाचल्याने ‘कोरोना’ होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:01 IST
घरात येणाऱ्या वस्तू, नोटा कशा पद्धतीने हाताळाव्यात, याचे ज्ञान आपल्याला वृत्तपत्रांतून मिळते. जगात, देशात व आपल्या शहरात काय घडामोडी घडत आहेत, त्यासंबंधिची पारखून घेतलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे वृत्तपत्र हेच आजघडीस प्रभावी माध्यम आहे. कोरोनासंदर्भात नाना संशोधने सुरू आहेत. त्याबाबतची रोज ताजी आणि विश्वसनीय माहिती वृत्तपत्रांतून मिळते. बिनधास्तपणे वृत्तपत्र वाचले पाहिजे.
वृत्तपत्र वाचल्याने ‘कोरोना’ होत नाही
ठळक मुद्देडॉ. प्रवीण बिजवे : दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचनानेच !