शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पुनर्नियोजनाचा मुद्दा विभागीय आयुक्तांच्या कोर्टात ?

By admin | Updated: December 22, 2016 00:33 IST

जिल्हा परिषदेच्या विविध लेखाशिर्षातील मार्च २०१७ अखेर पर्यंतच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत अपेक्षित बचत किंवा ...

विरोधक सरसावले : नियमबाह्य ठराव घेतल्याचा आक्षेप जितेंद्र दखने अमरावती जिल्हा परिषदेच्या विविध लेखाशिर्षातील मार्च २०१७ अखेर पर्यंतच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत अपेक्षित बचत किंवा वाढीच्या सुमारे ८ कोटी ७९ लाखांच्या पुनर्नियोजनास सोमवारी विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी घेतलेला ठराव नियमबाह्य असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. आता याविषयावर विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारी विरोधकांनी चालविली आहे. त्यामुळे पुनर्नियोजन कायम राहणार की कसे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेतील वादावर पडदा पडत नाही तोच पुन्हा १९ डिसेंबरला जि.प.ची सभा पार पडली. यासभेत सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या बळावर जिल्हा निधी सन २०१६-१७ अंतर्गत निधीच्या पुनर्नियोजनाचा ठराव एकमताने पारित केला. विशेष सर्वसाधारण सभेच्या अजेंडयावर पुनर्नियोजनाचा समावेश होता. मात्र, याबाबतची नोट सभागृहातील सदस्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे नेमके नियोजन कशाचे, हे सदस्यांना कसे कळणार, असा सवाल विरोधी सदस्यांनी प्रशासनाकडे केला. मात्र,यावर प्रशासनाने मौन बाळगल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने केलेल्या पुनर्नियोजनाविरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी विरोधी सदस्यांनी १९ डिसेंबरच्या सभेतील कामकाज व पुनर्नियोजन मंजूर केल्याच्या ठरावाची प्रत लेखी स्वरूपात मागितली आहे. मात्र, अद्याप विरोधीपक्षाला ती प्रत मिळाली नसल्याची माहिती आहे. परिणामी सत्ताधारी व विरोधकांमधील कलह वाढण्याची शक्यता आहे . जि.प.च्या अर्थसंकल्पात जिल्हा निधीत मिळणाऱ्या स्वउत्पन्नातून विकासकामे तसेच विभागनिहाय महत्त्वाच्या कामाकरिता आर्थिक तरतूद होते. मात्र यातील काही निधी मार्च अखेरपर्यंत अखर्चित राहणाऱ्या निधीचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. विशेष सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव पारीत करण्यात आला आहे. मात्र, विरोधकांनी चालविलेल्या हालचाली लक्षात घेता यात अडचणी येण्याची शक्यता आहे. जि.प.ची विशेष सर्वसाधारण सभा नियमबाह्य असून सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या ठरावाची प्रत प्रशासनाला मागितली आहे. मात्र ती अद्याप मिळाली नाही. चुकीच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागू -अभिजित ढेपे, जि. प. सदस्य पुनर्नियोजनाचा ठरावात नियमबाह्य काहीच नाही. अखर्चित निधीचा विनियोग हा विकासकामांवर केला जाईल. विरोधकांचा खटाटोप केवळ राजकीय हेतुने प्रेरीत आहे. त्यामुळे त्यांच्या आक्षेपाला महत्त्व नाही - बबलू देशमुख, गटनेता काँग्रेस