शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

रवि राणांचा भाजपला शह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

शनिवारी हा अंडरपास हार-फुलांनी सजविण्यात आला होता. ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली. आ. रवि राणा केशरी दुपट्टा परिधान शेकडो कार्यकर्त्यांसह लोकार्पणासाठी जात असताना परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. पाच वर्षांपासून मार्गाच्या बांधकामावर चौकीदारी करणारे ७७ वर्षीय भाऊराव डोंगरे व शाळकरी विद्यार्थ्याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देराजापेठ रेल्वे अंडरपासचे वृद्धाच्या हस्ते लोकार्पण, फुलांचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतीक्षित राजापेठच्या रेल्वे अंडरपासचे वृद्ध आणि शाळकरी विद्यार्थ्याच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. आमदार रवि राणा यांनी या राजकीय खेळीने भाजपला शह दिला तसेच पुन्हा एकदा नागरिकांचे लक्ष आपल्याकडे वळविले. महापौर चेतन गावंडे यांनी या अंडरपासचे लोकार्पण लवकरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे शुक्रवारीच जाहीर केले होते, हे विशेष.बडनेरा विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या आड कुणी येत असेल, तर त्याला आडवे करू, अशी जाहीर तंबी देणारे आमदार राणा यांनी शनिवारी ‘हम है राणाजी’ हे दाखवून दिले. शुक्रवारीच त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत अंडरपासची पाहणी केली. शनिवारी हा अंडरपास हार-फुलांनी सजविण्यात आला होता. ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली. आ. रवि राणा केशरी दुपट्टा परिधान शेकडो कार्यकर्त्यांसह लोकार्पणासाठी जात असताना परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. पाच वर्षांपासून मार्गाच्या बांधकामावर चौकीदारी करणारे ७७ वर्षीय भाऊराव डोंगरे व शाळकरी विद्यार्थ्याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. बल्लू जव्हेरी, सुनील राणा, जयंतराव वानखडे, जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, शैलेंद्र कस्तुरे, आशिष गावंडे, सुमती ढोके, ज्योती सैरिसे, नितीन बोरेकर, अजय मोरया, अजय गाडे, संजय मोहोड, संदीप गुल्हाने, प्रवीण सावळे, अनुप अग्रवाल, अभिजीत देशमुख, सचिन भेंडे, विनोद गुहे, पराग चिमोटे, सुरज मिश्रा आदी उपस्थित होते.

मी जनतेचा आमदार आहे. जनहितासाठी सदैव लढणार आहे. हा मार्ग राजकीय-प्रशासकीय अडथळ्यांमुळे रखडला होता. आज नागरिकांच्या सेवेत मार्ग खुला करताना अत्यानंद होत आहे. हा अविस्मरणीय सुवर्णक्षण आहे. - रवि राणा, आमदार

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा