शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रवि राणा यांचे शक्तिप्रदर्शन, ढोल ताशांच्या गजरात पायदळ रॅलीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

राजापेठ पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त डॉ. आष्टीकर यांच्यावर शाईफेक, जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी आमदार रवि राणांसह ११ जणांवर गुन्हे दाखल केले. मी पसार नाही तर दिल्ली येथे कामानिमित्त असल्याचा दावा करणारे आमदार राणा यांनी गुरुवारी अमरावतीत दमदार एन्ट्री केली. युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते, चाहत्यांची गर्दी हे जणू त्यांचे शक्तिप्रदर्शन होते. राणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी राणांचे औक्षण करून स्वागत झाले.

 लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक प्रकरणात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल असलेले बडनेऱ्याचे आमदार रवि राणा हे तब्बल १५ दिवसांनंतर गुरुवारी शहरात दाखल होताच त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. येथील इर्विन चौकात ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांचा वर्षाव करून युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून आमदार राणांचे जोरदार स्वागत करण्यात आले.राजापेठ पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त डॉ. आष्टीकर यांच्यावर शाईफेक, जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी आमदार रवि राणांसह ११ जणांवर गुन्हे दाखल केले. मी पसार नाही तर दिल्ली येथे कामानिमित्त असल्याचा दावा करणारे आमदार राणा यांनी गुरुवारी अमरावतीत दमदार एन्ट्री केली. युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते, चाहत्यांची गर्दी हे जणू त्यांचे शक्तिप्रदर्शन होते. राणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी राणांचे औक्षण करून स्वागत झाले. त्यानंतर राणा हे कार्यकर्त्यांसह पायी रॅलीद्वारे  जयस्तंभ चौकाकडे निघाले. येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना संबाेधित करताना आमदार राणांना अचानक भोवळ आली. लगेच त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कालांतराने राणा यांनी रुग्णालयातून सुटी घेतली.

गाडगेनगर, नांदगाव पेठ, वलगाव पोलीस बंदोबस्तआमदार रवि राणा हे गुरुवारी येथील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या गर्दीच्या अनुषंगाने गाडगेनगर, नांदगाव पेठ, वलगाव ठाण्यांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. शहर गुन्हे शाखेचे पथकही नजर ठेवून होते. 

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा