राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव ... गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाला शुक्रवारी थाटात प्रारंभ करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रसंतांच्या महासमधीची अशी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पहाटे महासमाधीच्या अभिषेकानंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. यात मानवसेवा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा टाळ पदन्यास, लेझिम पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधले. हजारो गुरूदेवभक्त या उत्सवात उत्साहाने सहभागी झाले आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव .
By admin | Updated: October 15, 2016 00:11 IST