शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लुटमारीसाठीच हत्या ?

By admin | Updated: October 9, 2016 01:06 IST

१४ दिवसांपूर्वी अंजनगाव तालुक्यातील चिंचोलीच्या युवकाचा गळा चिरून निर्घृन हत्या केल्याची...

 अमर साबळे हत्याप्रकरण : चार आरोपींना पोलीस कोठडी, आरोपीचा शोधदर्यापूर : १४ दिवसांपूर्वी अंजनगाव तालुक्यातील चिंचोलीच्या युवकाचा गळा चिरून निर्घृन हत्या केल्याची घटना लेहगाव रेल्वे-अंजनगाव मार्गावर घडली. याचे धागेदोरे दर्यापूर पोलिसांना गवसले. घटनेतील पाच आरोपींना अटक केली होती. पण एक आरोपी पोलीस तपासादरम्यान पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चार आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लुटमारीच्या उद्देशाने ही हत्या केल्याची बाब तपासात उघड झाली आहे. मृत अमरचे व त्याच्या वडिलाचे दोन लग्न झाल्याने व संपूर्ण कुटुंबाचा इतिहास गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे कौटुंबिक वादातून तर हे प्रकरण घडले नसावे. या दिशेने पोलिसांनी तपास केला. परंतु तपासामध्ये अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याने काही धागे उलगडले. यामध्ये गुरुवारी दर्यापूर पोलिसांच्या पथकाने महेंद्रसिंग गोपालसिंग राजपूत, गणेशसिंग हनियासिंग राजपूत (२७) सोहनसिंग ईश्वरसिंग राजपूत, (रा. जळम, नटवर कैलाशसिंग तंवर रा लेहगाव रेल्वे यांना अटक केली. परंतु तपास सुरु असतानाच महेंद्रसिंग गोपालसिंग राजपूत रा. उमाळी ता. मलकापूर, हा आरोपी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून पळाला. त्याचा शोध घेत असतानाच शुक्रवारी घटनेतील मुख्य आरोपी कपिल तंवरला पोलिसांनी मूर्तिजापूर रेल्वेस्टेशवरुन रात्री अटक केली. घटनेच्या दिवशी लुटमारीच्या उद्देशाने या आरोपींतानी संगनमताने दुचाकीवरून धारदार भाल्याने हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.ईतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)कपिल तंवर सराईत गुन्हेगार या घटनेतील पकडण्यात आलेला मुख्य आरोपी कपिल कैलाशसिंग तंवर हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्याच्या विरु द्ध यापूर्वीही कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल आहे. तसेच लेहगांव येथे त्याच्या घरी अवैध दारुचा व्यवसायही करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. अमर हा मद्यप्राशान करण्यासाठी कधीकधी लेहगांव रेल्वे येथे जात होता. त्यामुळे मृताची आरोपीशी तोंड ओळख असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हेगारांची अमरावती कारागृहात भेट या घटनेतील अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींची ओळख ते विविध गुन्ह्यात अटक असताना अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात काही महिन्यांपूर्वी झाली होती. येथूनच लुटमारीच्या घटनेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. तपास सुरू आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. लुटमारीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शीने तपासात पुढे आले आहे. लवकरच याचे कारण पुढे येईल.- सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापूर