शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बंदींना गांजा पुरविणाऱ्या दोघांना कोर्टात रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:59 IST

मुशिर आलम हत्याकांडातील दोन न्यायाधीन बंदींना गांजा पुरविणाºया दोन तरुणांना न्यायालयाच्या प्रसाधनगृहात शुक्रवारी दुपारी रंगेहात पकडण्यात आले. कारागृहातील सुरक्षा गार्डने दोन्ही आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देजेल गार्डची कारवाई : दोन्ही आरोपी गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुशिर आलम हत्याकांडातील दोन न्यायाधीन बंदींना गांजा पुरविणाऱ्या दोन तरुणांना न्यायालयाच्या प्रसाधनगृहात शुक्रवारी दुपारी रंगेहात पकडण्यात आले. कारागृहातील सुरक्षा गार्डने दोन्ही आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. रुपेशआप्पा गणेशआप्पा खेडकर (२८,रा. गवळीपुरा) व राजेश गोविंद मांडवे (२८, रा. कुंभारवाडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे न्यायालय परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.दीड वर्षांपूर्वी साबणपुरा परिसरात मुशिर आलम हत्याकांड घडले. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यातील दोघे जामिनावर बाहेर असून, तिघे अद्यापही कारागृहात आहेत. या हत्याकांडातील आरोपी उमेश आठवले, दिनेश आठवले व शुभम जवंजाळ यांना कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी दुपारी न्यायालयीन तारखेवर आणले होते. जिल्हा व सत्र न्यायालय (२) येथे या प्रकरणाची सुनावणी असल्यामुळे आरोपींना न्यायालयीन कक्षाच्या बाहेरील खुर्चांवर बसविले होते. दरम्यान उमेश आठवले लघुशंकेच्या बहाण्याने प्रसाधनगृहात गेला असता, त्याच्या मागेच पोलीस कर्मचारी एएसआय दिवाकर डोंगरे, पोलीस हवालदार हमीद खान व प्रदिप कावरे गेले. त्यावेळी तेथे रुपेशआप्पा खेडकर व राजेश मांडवे हे दोघे उमेश आठवलेला गांजा पुरविण्यासाठी उपस्थित असल्याचे पोलिसांना आढळले. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी प्रसाधनगृहात ठेवलेल्या आठ गांजाच्या पुड्या जप्त करून दोन्ही रुपेशआप्पा व राजेश मांडवेला ताब्यात घेतले. त्यांना न्यायाधीश तिवारी यांच्या न्यायालयात हजर केले.राजेश मांडवे हत्या प्रकरणातील आरोपीमुशिर आलम हत्याकांडातील पाच आरोपींपैकी राजेश मांडवे हा एक आरोपी आहे. त्याला घटनेनंतर अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान तो काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला आहे.न्यायालयात केक कापल्याचे प्रकरण गाजलेकाही महिन्यांपूर्वी मुशिर आलम हत्याकांडातील आरोपींनी न्यायालयाच्या प्रतिक्षालयात बर्थ डे केक कापून आरोपी उमेश आठवलेचा वाढदिवस साजरा केला होता. सदर प्रकरणाची तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी चौकशी केली. या घटनेच्या अनुषंगाने आरोपीसोबत उपस्थित असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती.अशाप्रकारे पोहोचतो बंदीजनाजवळ गांजामध्यवर्ती कारागृहातील बंदी व कैद्याजवळ गांजा आढळल्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले आहेत. बंदी व कैद्यांना न्यायालयीन तारखेवर आणल्या गेल्यावर तेथे बंदी व कैद्यांना भेटण्यासाठी काही जण येतात. त्याच्यामार्फत बंदी व कैद्यांना गांजासह अन्य काही अमली पदार्थ पुरविण्यात येत असल्याचे या घटनेवरून निदर्शनास येत आहे.

टॅग्स :Policeपोलिस