शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

बडनेर्‍यात राणा यांची परीक्षा!

By admin | Updated: June 9, 2014 23:20 IST

सुलभाताई खोडके यांना अनपेक्षितपणे पराभूत केल्यानंतर चर्चेत आलेले आमदार रवी राणा यांच्या अस्तित्वाची लढाई बडनेरा विधानसभा मतदारसंघात यावेळी असणार आहे.

लढाई अस्तित्वाची : सुलभा खोडकेंना राजकीय पक्षांची निमंत्रणेगणेश देशमुख - अमरावतीसुलभाताई  खोडके यांना अनपेक्षितपणे पराभूत केल्यानंतर चर्चेत आलेले आमदार रवी राणा यांच्या अस्तित्वाची लढाई बडनेरा विधानसभा मतदारसंघात यावेळी असणार आहे. रवी राणा यांनी आमदारकी मिळविल्यावर या ना त्या कारणाने ते कायम चर्चेत राहिलेत. कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याऐवजी त्यांनी स्वत:च्या युवा स्वाभिमानी पक्षाचा पसारा जिल्हाभर कसा वाढविता येईल, याच  दृष्टीने कसोशीने प्रयत्न केलेत. त्यांच्या पक्षाने महापालिका निवडणूक लढविली. एकच नगरसेवक निवडून येऊ शकला असला तरी त्यांनी संख्येच्या गणितात न गुरफटता लोकसभा क्षेत्रासाठी पत्नी नवनीत यांना रिंगणात उतरविले. पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळवून देऊन जणू त्यांनी अशक्यप्राय बाब शक्य करून दाखविली. या बड्या यशानंतरही त्यांनी स्वत: मात्र युवा स्वाभिमानी पक्षाशी जुळून राहणेच पसंत केले. राजकीय यशपूर्तीसाठी राष्ट्रवादीचा त्यांनी शिताफीने वापर केला. राष्ट्रवादीशी ते एकरूप झाले नाहीत. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेले रवी राणा यांनी अवघ्या पाच वर्षांत केलेल्या राजकीय उलथापालथी अचाट आहेत. त्यांच्या राजकीय शत्रुंची संख्याही त्यामुळेच वेगाने वाढली. सुलभाताई खोडके आणि संजय खोडके यांनी हृदयाच्या गाभार्‍यात दैवतासम विराजमान असलेल्या शरद पवारांशी जी फारकत घेतली तीच मुळी राणा दाम्पत्याच्या कारणाने. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राणा दाम्पत्य अवलंबित असलेले मार्ग अमरावती जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीसाठी धोकादायक ठरणारे आहेत. विधायक विचारधारा बाळगणार्‍या पवार कुटुंबातून अशा तत्त्वांना मुळीच बळ मिळू  नये, असा तात्त्विक आग्रह खोडके दाम्पत्याने शरद पवारांकडे धरला होता. पवारांनी या मुद्यावर खोडकेंच्या मताशी सहमती दर्शविल्यानंतरही अचानक नवनीत यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी बहाल करण्यात आली. रवी राणा हे सुलभाताईंकरवी सुरू असलेल्या विकास कामात खोडा घालतात. राष्ट्रवादीचे त्यामुळे खच्चीकरण होते, अशी तक्रार संजय खोडके, सुलभाताई खोडके यांची फार पूर्वीचीच. त्यानंतरही राष्ट्रवादीने राणा यांना बळ दिल्यावर राणा यांना रोखण्याची जबाबदारी आपण व्यक्तिगतरीत्या पार पाडू, असा निर्धारच खोडके दाम्पत्याने केला. राजकीय अस्तित्व त्यासाठी त्यांनी पणाला लावण्याची तयारी ठेवली; परंतु राणा दाम्पत्याशी जुळवून घेणे कदापि शक्य नाही, असे ठासून सांगितले. ही भूमिका ज्यांच्या जगण्याची तर्‍हा आहे, त्या खोडके दाम्पत्यावर मात करणे राणा यांच्यासमोरचे या निवडणुकीतील सर्वाधिक कडवे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बडनेरा विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक कमी मते मिळाली. हा आकडा ४९ हजारांचा आहे. नवनीत यांना निवडून द्या असे रवी राणा यांनी केलेले कळकळीचे आवाहन त्यांच्याच मतदारसंघातील लोकांनी साफ अव्हेरले. करो या मरोच्या भावनेतून खोडकेंनी उभारलेली विरोधाची भिंत, इतर आमदारांची ओढवलेली नाराजी, मतदारांनी दिलेला नाखुशीचा कौल, सत्ताधारी पक्षाविरुद्ध सामान्यांची असलेली असंतोषाची भावना या सर्व अडथळ्यांवर यशस्वी मात करणे हीच खरी रवी राणा यांची परीक्षा ठरणार आहे. सुलभाताई  खोडके यांनी पराभवानंतरही बडनेरा मतदारसंघात कायमस्वरुपी कार्य सुरू ठेवले. ऐन निवडणुकीच्या काळात वर्‍हाड विचार मंचाची स्थापना करून आश्‍चर्यकारक गर्दी  खेचणार्‍या सुलभाताई स्वसंघटनेच्या बॅनरखाली उभ्या राहतात की शिवसेना त्यांना स्वपक्षात सामील करवून घेऊ शकते, हा राजकीय डावपेचांचा विषय आहे. शिवसेनेचे दिगंबर डहाके यांनी पाच वर्षांपूर्वी बडनेरा मतदारसंघात कार्य सुरू केले आहे. एकेकाळी तिवसा मतदारसंघावर दावेदारी करणारे संजय बंड हे देखील यावेळी बडनेर्‍यातून लढण्यास खासे उत्सुक आहेत. सामान्यांशी ते नाळ जोडून आहेत; तथापि पक्षादेश शिरसावंद्य मानणार्‍या शिवसैनिकांमध्ये डहाके अग्रस्थानी आहेत.