शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राणा दाम्पत्याचे शक्तिप्रदर्शन; सेनेचे पोस्टर वॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता पंचवटी येथून खुल्या जीपने राणा दाम्पत्याची मिरवणूक निघाली. मागे तब्बल एक कि.मी. लांब वाहनाच्या रांगा होत्या. इर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर जयस्तंभ चौकात  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. राजकमल चौकात जंगी स्वागत झाले. दसरा मैदानालगत संकटमोचन हनुमान मंदिरात त्यांनी चालिसा पठण केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबई येथे ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर करताच राजद्रोहाचा गुन्हा आणि १४ दिवस कारागृह कोठडीला सामोरे गेलेले खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा हे तब्बल ३६ दिवसांनी शनिवारी अंबानगरीत दाखल झाले. डीजे, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे, गाड्यांचा ताफा अशा शक्तिप्रदर्शनाने  त्यांनी वेगळीच छाप उमटविली. नागपूर ते अमरावती प्रवासातही समर्थक व हनुमानभक्तांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.  शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता पंचवटी येथून खुल्या जीपने राणा दाम्पत्याची मिरवणूक निघाली. मागे तब्बल एक कि.मी. लांब वाहनाच्या रांगा होत्या. इर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर जयस्तंभ चौकात  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. राजकमल चौकात जंगी स्वागत झाले. दसरा मैदानालगत संकटमोचन हनुमान मंदिरात त्यांनी चालिसा पठण केले. दरम्यान, इर्विन चौकात भीम ब्रिगेडने विरोध केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तो मोडून काढला. 

रहाटगावात क्रेनद्वारे १५ फूट लांबीचा हार

रहाटगाव येथे राणा दाम्पत्यांचे आगमन होताच बाळू इंगोले यांनी १५ फूट लांब गुलाब पुष्पाचा हार चक्क क्रेनद्वारे आमदार रवि राणा, खासदार नवनीत राणा यांच्या गळ्यात घातला. यावेळी जय श्रीराम, पवनसुत हनुमान की जय अशा नाऱ्यांनी आसमंत दणाणून गेला. 

राजकमल चौकात ३५० किलोच्या हाराने स्वागत

राजकमल चौकात राणा दाम्पत्यांचे समर्थकांनी क्रेनद्वारे ३५० किलो वजनाच्या हाराने अभूतपूर्व स्वागत केले. राणा दाम्पत्य हात उंचावून नागरिक, व्यापारी, दुकानदारांना, वाहनचालकांना अभिवादन करीत होते.

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणा