लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : शहानूर प्रकल्प पूर्ण होऊन ३० वर्षे होत असताना रामापूर मायनरच्या रस्त्याचा वनवास संपलेला नाही. पावसाळयात हा रस्ता चिखलार रूतला आहे.या रस्त्यावर एक ट्रॉली मुरुमदेखील टाकण्यात आलेला नाही. १० वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तोंडी निवेदन व प्रसार माध्यमातून वारंवार मागणी झाली. तीन किमी अंतर असलेल्या रामापूर मायनरच्या खड्ड्यांमध्ये १० ते १५ ट्रॉल्या मुरूम जरी टाकला तरी या रस्त्याची समस्या मार्गी लागेल, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. मात्र शहापूर विभागाचे धोरण याबाबत उदासिन का, असा प्रश्न शेतकरी व मजूर वर्गांतर्फे केला जात आहे.शहापूर प्रकल्पाला डावा व ऊजवा असे दोन मुख्य कालवे आहेत. एक रामापूर मायनर व दुसरा पांढरी मायनर. यातील रामापूर मायनरची परिस्थिती अतीदयनिय आहे. या रस्त्यावरून ट्रॅक्टर, दुचाकी, बैलगाड्या शेतकरी, मजुरांची सतत वर्दळ राहते. पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर अनेकदा बैल दगावल्याच्या घटना घडल्या. शहानूर विभागाचे अधिकारीवर्ग हे प्रकल्पाकडे पांढरी ते शहरातून गेलेल्या डांबरीकरणाच्या रस्त्यावरून ये-जा करतात. त्यामुळे मातीच्या रस्त्याबाबत ते अनभिज्ञ आहेत. तीन वर्षांपूर्वी शहानूर विभागाचे एसडीओ मोहिते यांनी शेतकºयांच्या निवेदनावरून रामापूर मायनरची पाहणी केली होती. शेतकºयांना दुरुस्तोबाबत आश्वासनही दिले होते. मात्र, ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. रस्ता अजून 'जैसे थे' च्याच स्थितीत आहे.या रस्त्यावर खड्डे असल्याने बैलांचा अपघात होऊन ते मरणपंथाला लागत आहेत. शहानूर विभागाकडे तक्रारी दिल्यावरही मुरुम टाकला नाही.- किशोर पटोकार, शेतकरीआजपर्यंत या रस्त्यावर कागदोपत्री किती मुरुम टाकण्यात आला, याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी.- रामेश्वर नागपुरे, शेतकरी
रामापूर मायनर नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST
शहापूर प्रकल्पाला डावा व ऊजवा असे दोन मुख्य कालवे आहेत. एक रामापूर मायनर व दुसरा पांढरी मायनर. यातील रामापूर मायनरची परिस्थिती अतीदयनिय आहे. या रस्त्यावरून ट्रॅक्टर, दुचाकी, बैलगाड्या शेतकरी, मजुरांची सतत वर्दळ राहते. पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.
रामापूर मायनर नादुरुस्त
ठळक मुद्देपावसाळ्यात दुरवस्था : मार्गात चिखल, लोकप्रतिनिधींचा लक्षवेध