शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘रमाई’ अंमलबजावणीत महापालिका माघारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 21:45 IST

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रमाई घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती महापालिका माघारल्याचा आक्षेप आ. रवि राणा यांनी घेतला.

ठळक मुद्देरवि राणांचा आरोप : ३७.५० कोटींच्या अनुदानाचे वाटप केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रमाई घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती महापालिका माघारल्याचा आक्षेप आ. रवि राणा यांनी घेतला. ‘रमाई’तून गरीब, सामान्यांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी २६ एप्रिल २०१७ रोजी ३७.५० कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त असताना ते केव्हा वाटप करणार, असा सवाल त्यांनी बुधवारी आढावा बैठकीतून उपस्थित केला.येथील शासकीय विश्रामभवनात रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आ.राणांच्या पुढाकाराने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त हेमंत पवार, शहर अभियंता जीवन सदार, उपायुक्त देशमुख, नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, उपकार्यकारी अभियंता रवींद्र पवार, विधी व न्याय सभपाती सुमती ढोके, नगरसेवक आशिष गावंडे, सपना ठाकूर, उमेश ढोणे, विनोद जायलवाल आदी उपस्थित होते. यावेळी आ. राणा यांनी आवास योजनेत दिरंगाई होत असल्याची बाब आवर्जून मांडली. घरकूल मंजूर झाले असताना प्रशासनाच्या दुर्लक्षाने लाभार्थ्यांना धनादेश मिळत नसल्याची बाब उपस्थित केली. ५४९ घरकूल मंजूर झाले असताना लाभार्थ्यांना धनादेश कधी, कसे? वितरित करणार, असा जाब आयुक्त हेमंत पवार यांना आ. राणांनी विचारला. रमाई घरकूल आवास योजनेचे अनुदान प्राप्त असताना ते वाटपात दिरंगाई होत आहे.