शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भिलखेड्यात तीन घराची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:12 IST

तालुक्यातील बोराळा भिलखेडा येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागून तीन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत तीन बकऱ्या ठार झाल्या, तर आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे.

ठळक मुद्देकुटुंब उघड्यावर : तीन बकऱ्याही जळाल्या

आॅनलाईन लोकमतचिखलदरा : तालुक्यातील बोराळा भिलखेडा येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागून तीन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत तीन बकऱ्या ठार झाल्या, तर आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे.शुक्रवारी दुपारी बोराळा भिलखेडा येथे जलयुक्त शिवार अंतर्गत ग्रामस्थांची बैठक सुरू असताना सुंदरलाल गंगाराम काळे, रामकिसन चिमोटे, पतिराम धोटे या तीन आदिवासींच्या घरांना अचानक आग लागली. ग्रामस्थांनी अचलपूर येथील अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण नष्ट झाले होते. या तीनही कुटुंबात प्रत्येकी पाच असे एकूण १५ सदस्य राहतात. रामकिसन चिमोटे मजुरीसाठी बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते. जिल्हा परिषद सदस्य दयाराम काळे, पंचायत समिती सभापती कविता काळे, सदस्य बन्सी जामकर, सरपंच संजय भासकर यांनी घटनास्थळाला भेट दिली.५० हजारांची रोकड जळालीघरामागील बांबूच्या झाडाच्या घर्षणाने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, या आगीत घरातील धान्य, कपडे, अंथरूण-पांघरूण, भांडे आणि तिघांच्या घरातील ५० हजारांची रोकड जळाली. सोन्या-चांदीचे दागिनेसुद्धा या आगीत नष्ट झाले. गोठ्यात बांधलेल्या तीन बकºया होरपळून ठार झाल्या. तिन्ही कुटुंब उघड्यावर आल्याने प्रशासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी दयाराम काळे यांनी केली आहे.संसार झाला उद्ध्वस्तचिखलदरा तालुक्यात वॉटर कप स्पर्धा अंतर्गत खेड्यांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या बैठका सुरू आहेत. बोराळा भिलखेडा येथील आदिवासींसोबत प्रशासकीय अधिकारी जलयुक्त शिवार योजनेची बैठक होत असताना, या घराला आग लागली आणि क्षणात त्यांचा आयुष्यभर जमा केलेला संसार उद्ध्वस्त झाला. हा विचित्र योगायोग चर्चेचा विषय ठरला होता.