रवी राणांसमोर पोलीस प्रशासन नमले : २६ अटी, शर्तींवर परवानगी अमरावती : राजापेठ चौकातील उड्डाणपुलाचे बांधकाम व वाहतुकीची वर्दळ बघता युवा स्वाभिमानीच्या दहिहंडीची परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमिवरील २६ अटी व शर्तींवर युवा स्वाभिमानीच्या दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आ. रवि राणांसमोर पोलीस प्रशासन नमले, अशी चर्चा शहरवासीयांमध्ये होत आहे. दरवर्षी युवा स्वाभिमानीकडून राजापेठ चौकात दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येते. जिल्ह्याभरातून अनेक स्पर्धेत दहिहंडीत सहभागी होण्याकरिता येतात. त्यातच आ. रवि राणा यांच्यामार्फत चित्रपट सृष्टीतील कलावंतांना बोलाविण्यात येत असल्यामुळे तरुणाईची मोठी गर्दी राजापेठ चौकात गोळा होते. यंदाही युवा स्वाभिमानीकडून 'सैराट' चित्रपटातील कलावंतांना बोलावण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा सैराटमधील कंलावताना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमणार आहे. या चौकातच दहिहंडी स्पर्धा घेण्यास परवानगी मिळावी, याकरिता आयोजक प्रयत्नरत होते. तसा आग्रहही आ.रवि राणांसह अन्य कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे रेटून धरला होता. मात्र, उड्डाणपूल बांधकाम व वाहतूक वर्दळीच्या अनुषंगाने परवानगी नाकारण्यात आली होती. गुरुवारी दहिहंडी आयोजनाकांनी पोलीस आयुक्तांना राजापेठ चौकातील पाहणी करण्याकरिता बोलावले होते. यावेळी पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम उपस्थित होते. या ठिकाणी दहिहंडी उत्सवाला परवानगी द्यावी किंवा नाही, याबाबत पोलीस आयुक्त विचाराधीन होते. मात्र, आयोजकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन करण्याची ग्वाही दिल्यानंतर त्यांच्या दहिहंडी स्पर्धेला हिरवी झेंडी देण्यात आली आहे. काय आहेत, अटी व शर्ती ?आयोजनाकांना वेळेच्या मर्यादेचे पालन करणे अनिवार्य राहील, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागतील, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दहिहंडीची उंची २० फुटांपेक्षा अधिक ठेवता येणार नाही. स्पर्धेत १८ वर्षांवरील युवकांना सहभाग घेता येईल, तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, सुरक्षा बेल्ट व दहिहंडीच्या ठिकाणी फोम किंवा तनसाचे थर पसरावेत, वाहतुकीस अडथळा झाल्यास ऐनवेळी परवानगी रद्द करून कायद्येशीर कारवाई केली जाईल. स्पर्धा क्षेत्रात बॅरिकेटींग आवश्यक, गर्दी आवारण्याकरिता स्वयसेवक नेमणे, प्रक्षोभक घोषणा देता येणार नाही, ज्वलनशील पदार्थ ठेवता येणार नाही, इतर जमातीच्या भावना दुखाविल्या जाणार नाही, याबाबत दक्षता घेणे, ध्वनीप्रदूषण कायद्याचे तंतोतंत पालन करणे, बंदोबस्तातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सूचनेचे पालन करणे, प्राण्याचा वापर करता येणार नाही. मनपा, पीडब्ल्यूडीचे व अन्य विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक, अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच पिण्याच्या पाण्याची सोय असावी, कलावंतांच्या सुरक्षेची जबाबदारी आयोजकांची, पार्किंग व्यवस्था हवी, कमेटी स्थापन करणे, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था, ये-जा करणारा मार्ग मोकळा हवा, व्हीआयपी व कलावंतांसाठी मार्ग मोकळा ठेवावा.दहिहंडी विदर्भाला समर्पित युवा स्वाभिमानची ही दहिहंडी विदर्भाला समर्पित राहणार आहे. दहिहंडीत कार्यक्रमामध्ये आ.राणा यांच्या मुलांच्या नामकर्णा सोबत अन्य शंभर मुला-मुलीचे नामकरणा होणार आहे. यासोबतच दहिहंडी सोहळयाचे छायाचित्रण करणाऱ्या दहा छायाचित्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दहिहंडीला सर्वधर्मीय धर्मगुरू उपस्थित राहणार आहे. ज्या मुला मुलींचे नामकरण या सोहळ्यात होईल त्यांच्या पालकांना कपडे घेतले जाणार आहे. याशिवाय आर्थिक मदतही दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)तीन एसीपींच्या नेत्तृत्वात तीनशे पोलिसांचा बंदोबस्तराजापेठ चौकातील दहीहंडी स्पर्धेत दरवर्षीचे तौबा गर्दी पाहायला मिळते, यंदा तरी सैराटच्या आर्ची व परश्या या मुख्य भुमिका करणाऱ्या कलावंत आयोजनकांनी बोलाविले आहे. त्यामुळे २८ आॅगस्ट रोजी होणाऱ्या दहीहंडीलाही तौबा गर्दी होणार आहे. त्यामुळे तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या नेत्तृत्वात सात पोलीस निरीक्षक, २४ एपीआय व पीएसआय, २०० पोलीस कर्मचारी, ५० महिला पोलीस, १ आरसीपी प्लॉटून असा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. ं२६ प्रकारच्या अर्टी व शर्ती पूर्तता करण्याची ग्वाही आयोजकांनी दिल्यामुळे त्यांना राजापेठ चौकातील दहीहंडी स्पर्धेची परवानगी देण्यात आली आहे. या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास वेळेवर स्पर्धे रद्द करण्यात येईल, अशी सुचनाही आयोजकांना देण्यात आली आहे. दत्तात्रय मंडलीक, पोलीस आयुक्त.
राजापेठ चौकातच होणार युवा स्वाभिमानीची दहिहंडी
By admin | Updated: August 27, 2016 00:12 IST