शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

घराची किल्लीच ठरली राजेंद्र मेश्रामचा काळ!

By admin | Updated: July 10, 2014 23:20 IST

‘काळ आला पण वेळ आली नाही’असे आपण म्हणतो. पण, काळ आला की वेळ आपोआपच जुळून येते, याचा प्रत्यय वलगाव मार्गावरील अपघातादरम्यान पुन्हा एकदा आला. सिमेंटच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रक खाली दबून

वलगाव येथील अपघात : पत्नी बचावली अन् त्याचा झाला चेंदामेंदा संजय पंड्या -अमरावती‘काळ आला पण वेळ आली नाही’असे आपण म्हणतो. पण, काळ आला की वेळ आपोआपच जुळून येते, याचा प्रत्यय वलगाव मार्गावरील अपघातादरम्यान पुन्हा एकदा आला. सिमेंटच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रक खाली दबून प्राण गमावणाऱ्या नांदुरा येथील राजेंद्र मेश्राम (४३) हे त्यांच्या पत्नीला घरी जाताना बघून फक्त घराची किल्ली देण्याकरिता पोहोचले आणि हा भीषण अपघात घडला.राजेंद्र केशव मेश्राम यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. गुरूवारी नांदुरा गावातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या केवट नामक महिलेचे निधन झाले होते. तिच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी राजेंद्र गेले होते. पत्नी शेतात कामावर गेली असल्याने राजेंद्र मेश्राम यांनी घराला कुलूप लावले होते. नांदुरा गावापासून १ किलोेमीटर अंतरावर लांब पेढी नदीच्या काठावर महिलेवर अंत्यसंस्कार सुरू होते. तेव्हा राजेंद्र यांना त्यांची पत्नी नर्मदा मेश्राम घराकडे परतताना आढळून आली. घराला कुलूप असल्याने पत्नीची पंचाईत होऊ नये, यासाठी अंत्यसंस्कारामधून उठून राजेंद्र पत्नीकडे गेले. पत्नीला चावी देऊन पुन्हा परतण्याचा त्यांचा मानस होता. परंतु पत्नीजवळ पोहोचताच सिमेंटच्या पोत्यांनी भरलेला ट्रक मागून भरधाव त्यांच्याकडे आला आणि चालकाचे संतुलन बिघडल्याने ट्रक पलटला. या भीषण अपघातात राजेंद्र मेश्राम यांचा ट्रकखाली दबून मृत्यूू झाला. तर त्यांची पत्नी नर्मदा ट्रकच्या धक्क्याने दूरवर फेकल्या गेल्या. त्यादेखील या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. पत्नीला चावी देण्याचे निमित्त झाले अन् राजेंद्र मेश्राम यांना काळाने हिरावून नेले. त्यांची पत्नीदेखील गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. परिसरात शोककळा पसरली.