शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: July 15, 2016 00:33 IST

यावर्षी मान्सून विदर्भमार्गे राज्यात दाखल झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली व हे क्षेत्र मध्यप्रदेशमार्गे

आता आॅगस्टमध्ये मुसळधार : दोन आठवड्यांत वार्षिक सरासरीच्या दुप्पट पाऊस अमरावती : यावर्षी मान्सून विदर्भमार्गे राज्यात दाखल झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली व हे क्षेत्र मध्यप्रदेशमार्गे विदर्भात सरकल्यामुळे विदर्भात पावसाचे आगमन झाले. या आठवड्यात मध्यप्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने जिल्ह्यात सलग जोरदार पाऊस पडला. पावसाचा जोर आता ओसळला असला तरी जुलै अखेरपर्यंत काही ठिकाणी कधी अधिक पाऊस पडणार आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार जिल्ह्यासह विदर्भात जुलै अखेर पाऊस कमी राहणार असला तरी आॅगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस चांगलीच हजेरी लावणार आहे. दरम्यान २४ तासात पाऊस जिल्ह्यात निरंक राहिला. जिल्ह्यात यंदा अपेक्षित वार्षिक सरासरीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक पाऊस गेल्या १५ दिवसांत पडला आहे. यंदा पावसाची ८१४.५ मिमी वार्षिक सरासरी अपेक्षित असताना १३ जुलैपर्यंत ४६०.८ मिमी पावसाची नोंद झाली ही १७५.९ टक्केवारी आहे. तर हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ५६.६ टक्के आहे. जिल्ह्यात १ जून ते १३ जुलै या कालावधीत २६९.९ मिमी पावसाची अपेक्षित सरासरी असताना आतापर्यंत ४६०.८ मिमी पाऊस पडला. सर्वाधिक ६२९ मिमी पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला तर सर्वात कमी ३३२.२ मिमी पाऊस भातकुली तालुक्यात पडला. अमरावती तालुक्यात ३५९.३ मिमी, नांदगाव खंडेश्वर ३९२.३ मिमी, चांदूररेल्वे ४०९.मिमी, अचलपूर ४६०.३ मिमी, चांदूरबाजार ४४१.२ मिमी, दर्यापूर ४७७.४ मिमी, अंजनगाव सुर्जी ४३७.८ मिमी, मोर्शी ५६२.६ मिमी व धारणी तालुक्यात ५९१.४ मिमी पाऊस पडला. ४८ तासांत जिल्ह्यात ९०.७ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यात ६६ मिमी पाऊस आहे. ही अतिवृष्टी समजण्यात येते. अमरावती तालुक्यात १७.२, भातकुली १४.२, नांदगाव खंडेश्वर ९, चांदूररेल्वे १६.८, धामणगाव रेल्वे २२, तिवसा ३, मोर्शी १९.२, वरुड २८.६, अचलपूर १४.१, चांदूरबाजार ९, दर्यापूर ३९, अंजनगाव १६, अशी नोंद झाली आहे. पावसाची आतापर्यंत १७५.९ टक्केवारी जिल्ह्यात १४ जुलैपर्यंत १७५.९ टक्के पाऊस पडला. सर्वाधिक २२९ टक्के पाऊस अंजनगाव सुर्जी तालुक्यात पडली तर सर्वात कमी १३८.४ मिमी पाऊस भातकुली तालुक्यात पडला. अमरावती १५१.९, नांदगाव १५६.४, चांदूररेल्वे १६४.९, धामणगाव १८५.३, तिवसा २२२.७, मोर्शी २१७.०, वरुड ११७.८, अचलपूर १९३.३, चांदूरबाजार १९०.५, दर्यापूर २१५.८, धारणी १८३.४ व चिखलदरा तालुक्यात १४८ टक्के पाऊस पडला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५६.६ टक्के पाऊस जिल्ह्यात पावसाची वार्षिक ८१४.५ सरासरी अपेक्षित आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ५६.६ टक्के पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ७५.५ टक्के पाऊस तिवसा तालुक्यात पडला. अमरावती ४६.९, भातकुली ४५, नांदगाव ५३.१, चांदूररेल्वे ५४.४, धामणगाव ६२.८, मोर्शी ७४.२, वरुड ४०.७, अचलपूर ६६, चांदूरबाजार ६४.१, दर्यापूर ७४.९, अंजनगाव ७१, धारणी ५०.४ व चिखलदरा तालुक्यात ४१.२ टक्के पाऊस पडला.