शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात पावसाची उसंत; ३८ तालुके सरासरीच्या दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:41 IST

पुष्य नक्षत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यावर खरीप पिकांना जीवदान मिळाले. मात्र, मान्सूनचे ६५ दिवस उलटत असताना पश्चिम विदर्भातील तब्बल ३८ तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी गाठलेली नाही.

ठळक मुद्देयवतमाळ, वाशिम जिल्हा माघारला

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुष्य नक्षत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यावर खरीप पिकांना जीवदान मिळाले. मात्र, मान्सूनचे ६५ दिवस उलटत असताना पश्चिम विदर्भातील तब्बल ३८ तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे पश्चिम विदर्भातील जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झालेली नाही. १ जून ते ५ ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित असलेल्या पावसाच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात ९४ टक्के, अकोल्यात १०१.४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात केवळ ६२.२ टक्के, बुलडाण्यात १०६.१ टक्के, तर वाशिम जिल्ह्यात केवळ ६६.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. एकूण ५६ तालुक्यांपैकी केवळ १८ तालुक्यांनी सरासरी गाठली.अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, धारणी व चिखलदरा हे सहा तालुके, अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा व बाळापूर हे चार तालुके, बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर या आठ अशा एकूण १८ तालुक्यांमध्ये सरासरी पावसाने शंभरी गाठली आहे. अर्थात १ जूनपासून ते ५ ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित असलेल्या पावसाची तेथे शतप्रतिशत नोंद झाली आहे. अन्य ३८ तालुके दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यवतमाळ आणि वाशिममधील एकाही तालुक्याने सरासरी गाठली नाही.वार्षिक पर्जन्यमानाच्या ४८ टक्के पाऊसजून ते ३० सप्टेबर हा मान्सूनचा कालावधी समजला जातो. या चार महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागात सरासरी ७७७.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. त्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ६५ दिवसांमध्ये ४८.७ टक्के पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात ५२.८, अकोल्यात ५७.६, यवतमाळमध्ये ३५.७, बुलडाणा जिल्ह्यात ५९.३ व वाशिम जिल्ह्यात ३८ टक्के पावसाची नोंद झाली.

टॅग्स :Rainपाऊस