शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मान्सूनपूर्व वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:46 IST

शहरात शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता मान्सूनपूर्व सरी बरसल्याने अमरावतीकरांना उन्हाच्या झळांपासून थोडा दिलासा मिळाला. वादळी वारे व विजेच्या गडगडाटामुळे काही वेळाकरिता जनजीवन विस्कळीत झाले होते.

ठळक मुद्देवृक्ष उन्मळले, वाहतूक खोळंबली : शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता मान्सूनपूर्व सरी बरसल्याने अमरावतीकरांना उन्हाच्या झळांपासून थोडा दिलासा मिळाला. वादळी वारे व विजेच्या गडगडाटामुळे काही वेळाकरिता जनजीवन विस्कळीत झाले होते.एप्रिल अखेरपासून उन्हाचा सर्वाधिक तडाखा अमरावतीकरांना बसला. २९ मे रोजी पारा ४७ अंशावर होता. आता पुढे हळूहळू उन्हाच्या झळा कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला होता. सोबत विदर्भात काही ठिकाणी पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली होती. हे भाकीत खरे ठरले असून, विदर्भातील काही शहरांसह अमरावतीतदेखील पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी वृक्ष कोलमडून पडले. बेनाम चौकातील तीन वृक्ष तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा अद्याप खंडित आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून रस्त्यावर कोसळलेले वृक्ष बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. शहरातील दहा ते बारा ठिकाणी वृक्षांमुळे फलकांचे मोठे नुकसान झाले. बेनाम चौक, साईनगर, वलगाव रोड, चैतन्य कॉलनी, एमआयडीसी परिसरासह आदी ठिकाणांचे वृक्ष कोलमडून पडले होते. अग्निशमनच्या आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल होईपर्यंत या मार्गातील वाहकतूक ठप्प झाली होती.तिवस्यात वर्दळीच्या ठिकाणी झाड कोसळलेतिवसा : तालुक्यात शुक्रवारी रोजी दुपारी ३.१५ वाजता अचानक वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस कोसळला. नगरपंचायत ते बाजार ओळीकडे जाणाऱ्या मुख्य वर्दळीच्या मार्गावर पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात असलेले भिंगरीचे महाकाय झाड कोसळले. नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी मदतकार्याचे निर्देश दिले.रोहणखेडमध्ये वादळ; तीन जनावरांचा बळीमोर्शी : तालुक्यातील रोहणखेड येथे ३१ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळाच्या तडाख्याने विनायक खरबडे यांचा गोठा कोसळल्याने २० हजारांचा घोडा, गाय व वासरूही मरण पावले. म्हैस जखमी झाली आहे. पशुधन विकास अधिकारी गजानन महल्ले यांनी शवविच्छेदन केले. खरबडे यांचा दुुग्धव्यवसाय बुडाला आहे.वीज कोसळून महिलेचा मृत्यूदर्यापूर : तालुक्यातील चांदूर जहानपूर येथील चंद्रकला बकाराम नांदणे ही महिला शुक्रवारी दुपारी ४ वाजता वीज अंगावर कोसळून ठार झाली. ती चंद्रभागा नदीपात्रात मासोळ्या पकडण्याकरिता गेली होती. पोलीस पाटील वानखडे यांच्या माहितीवरून ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी घटनास्थळ गाठले.वाऱ्यामुळे खारतळेगावात अग्नितांडवखारतळेगावात शुक्रवारी सायंकाळी कुटाराच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली होती. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाल्यावर वादळी वाऱ्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागलेले कुटार उडून पसरल्यानंतर अग्नितांडवच सुरू झाले. गाव आगीच्या विळख्यात असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन पाण्याचे बंब काही वेळातच पोहोचले. अग्निशमन दलाने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर काही वेळाने पाऊस बसरला. अग्निशमन व पावसामुळे आग नियंत्रणात आली. येवद्याजवळ उमरी मंदिर येथे वादळाने १० घरांचे छप्पर उडाल्याची माहिती आहे.