शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

२ जूनपर्यंत विदर्भात मान्सूनपूर्व वादळी पाऊस

By admin | Updated: May 30, 2015 00:38 IST

मान्सूनच्या वाऱ्यांनी अर्धी श्रीलंका व्यापली असून ३० मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्यास अनुकूल परिस्थिती

हवामान तज्ज्ञांचा अंदाज : उष्णतेची लाटही राहणारअमरावती : मान्सूनच्या वाऱ्यांनी अर्धी श्रीलंका व्यापली असून ३० मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्यास अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे २ जूनपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर पश्चिमी विक्षेप चक्राकार वाऱ्याच्या स्वरुपात तीन किलोमिटरच्या उंचीवर सक्रिय आहेत. मध्यराजस्थानच्या दीड किलोमीटर उंचीवरही चक्राकार वारे वाहात आहेत. केरळमध्ये पूर्व-पश्चिम ही खंडित वाऱ्याची दिशा आहे. पूर्व बिहार आणि लगतच्या हिमालयीन पश्मिच बंगालच्या दीड किलोमिटर उंचीवरही चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे २ जूनपर्यंत विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर अन्य ठिकाणच्या कमाल तापमानात २ डिग्री सेल्सीअसने घट होण्याची शक्यता आहे. परिणामी २ जूनपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह मान्सुनपूर्व वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे कडाक्याच्या उकाड्यापासून दिलासा मिळेल.अमरावतीत मेघगर्जनेसह वादळी पाऊसजिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवारी मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची ताराबंळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतामानाने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत होती. मात्र, गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून थोडा दिलासा मिळाला आहे. आता पुढील काही दिवस ऊन व पावसाचा खेळ सुरु राहणार असून नागरिक मान्सूनची प्रतीक्षा करीत आहेत.