शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी; मृग बहर अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

संत्र्याचा मृग बहर हा १०० टक्के पावसाच्या भरवशावर अवलंबून असतो. त्यात यंदा मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मेअखेरपर्यंत बागांचे सिंचन केले. परंतु, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने अनपेक्षित सुरुवात केली. त्यामुळे मृग बहराचे गणित बिघडले.

ठळक मुद्देविम्याकडेही पाठ : कृषी अधिकाऱ्यांचा लक्षवेध, कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : लांबलेल्या पावसामुळे यंदा संत्र्याचा मृग बहर अडचणीत आला आहे. आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील संत्र्याचा मृग बहर निसर्गाच्या लहरीपणामुळे हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत.वरूड-मोर्शीच्या संत्र्याची चव आखाती देशांनी चाखली आहे. एकेकाळी वरूड तालुक्याला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणूनही ओळखले जात होते. वरूड तालुक्यात एकूण १९ हजार हेक्टर क्षेत्रफळ संत्र्याच्या लागवडीखाली आहे. येथील बहुतांश शेतकरी मृग बहर घेण्यास इच्छुक असतात. संत्र्याचा मृग बहर हा १०० टक्के पावसाच्या भरवशावर अवलंबून असतो. त्यात यंदा मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मेअखेरपर्यंत बागांचे सिंचन केले. परंतु, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने अनपेक्षित सुरुवात केली. त्यामुळे मृग बहराचे गणित बिघडले.मृग बहरासाठी एक महिन्याचा ताण आवश्यक असतो. झाडांना पाहिजे तेवढा ताण बसला नाही. पहिल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्यामुळे संत्रा झाडांनी मोठ्या प्रमाणावर नवती घेतली आहे. तालुक्यात अजूनही दमदार पाऊस बरसलेला नाही. आता फूट होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी आंतरपीक म्हणून तूर किंवा सोयाबीनकडे वळले आहेत. ‘लोकमत’ ने ३ जूनच्या अंकात भाकीत व्यक्त केले होते, ते तंतोतंत खरे ठरले.संत्र्याचा ऑनलाइन विम्याकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. ती मुदत २५ जून होती.संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जेथे झाडांची नवती निघाली नसेल किंवा झाड सुप्तावस्थेत असेल, तेथे संजीवक व १२:६१:०० फवारणीचे खत मिसळून तातडीने फवारणी करावी. दमदार पाऊस झाल्यास परिस्थिती बदलू शकते.- श्यामसुंदर ताथोडे, प्राचार्य, स्व.पंजाबराव ठाकरे कृषी विद्यालय, हातुर्णावरूड तालुक्यातील १९ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. पैकी ९ ते १० हजार हेक्टर क्षेत्रावर मृग बहर घेतला जातो. मात्र पावसाच्या दीर्घ दडीने तो हातातून जाण्याची शक्यता आहे. कोट्यवधीचे नुकसान संभवते.- उज्ज्वल आगरकरतालुका कृषी अधिकारी, वरूड.बºयाच शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. शासनाने संत्रा पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी. संत्र्याला पीक विम्याचे कवच मिळाल्यास शासनाचा भार काही प्रमाणात हलका होईल.- सुधाकर दोडसंचालक, बाजार समिती वरुड

टॅग्स :Natureनिसर्ग