शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

पावसाने केले सळो की पळो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

अमरावती : जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून विजांच्या कडकडाटाने सुरू झालेल्या पावसाच्या पाण्याने सात मंडळांमध्ये अतिवृष्टी आणली. धामणगाव, चांदूर रेल्वे, अमरावती, ...

अमरावती : जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून विजांच्या कडकडाटाने सुरू झालेल्या पावसाच्या पाण्याने सात मंडळांमध्ये अतिवृष्टी आणली. धामणगाव, चांदूर रेल्वे, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, तिवसा या पाच तालुक्यांमध्ये सातत्याने पाऊस कोसळत आहे.

अमरावती तालुक्यातील बडनेरा मंडळात १११.५ मिमी व शिराळा मंडळात ६२.५ मिमी पाऊस कोसळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा मंडळात ११६ मिमी व धानोरा मंडळात ९८.८ मिमी पाऊस कोसळला. परिणामी माहुली चोर येथे पुलावरून पाणी गेले. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला मंडळात ९३.५ मिमी पाऊस झाला. तिवसा तालुक्यातील मोझरी शिवारात ७२.३ मिमी पावसाची नोंद झाली, धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी महसूल मंडळात ६६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वरूड, मोर्शी, धारणी, चिखलदरा या तालुक्यांमध्ये पिकांना पावसाची ओढ लागली आहे.

---------------------

तालुकानिहाय बाधित गावांची संख्या

तिवसा तालुक्यात २२, भातकुली २३, चांदूर रेल्वे ५, धामणगाव रेल्वे २७, नांदगाव खंडेश्वर ५, मोर्शी ४, वरूड ७, अंजनगाव सुर्जी ८, अचलपूर २, धारणी १, चिखलदरा ५ अशी एकूण १०९ गावे बुधवारी रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने बाधित झाली.

--------------

एक जण गेला वाहून

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निमखेड बाजार येथील ग्रामपंचायत कर्मचारी लखाड-खिराळा मार्गावरील पुलावरून पाय घसरल्याने वाहून गेला.

-------------------

९० प्रकल्पांत ८४.३८ टक्के साठा

दममदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एक मोठा पाच मध्यम व ८४ लघु अशा एकूण ९० प्रकल्पांत सरासरी ८४.३८ टक्के पाणीसाठा साचला आहे.

----------------------

१७ जणांचा रेस्क्यू

तिवसा तालुक्यातील भिवापूर तलावात अडकून पडलेल्या सहा जणांचा बुधवारी रात्रीपासून रेस्क्यू करण्यात आला. ते अमरावती शहरातील रहिवासी आहे. एकपाळा येथील त्रिवेणी संगमावर अडकलेल्या तिघांना पुरातून बाहेर काढण्यात आले. रायगड प्रकल्पाच्या पाण्यामुळे कोलाड नदीच्या पुरात पळसखेड, दिघी येथील आठ जण अडकून पडले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

-------------------

२७८ घरांचे नुकसान

जिल्ह्यातील २७८ घरांचे २४ तासांच्या पावसात अंशत: नुकसान झाले, तर पाच घरे कोलमडून पडली. यात तिवसा तालुक्यातील ८७, भातकुली ७६, चांदूर रेल्वे १४, धामणगाव रेल्वे १७, नांदगाव खंडेश्वर ५१, मोर्शी ७, वरूड ९, अंजनगाव सुर्जी ९, अचलपूर २, धारणी १ व चिखलदरा तालुक्यातील ५ अशा २७८ घरांचे अंशत: नुकसान झाले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३, वरूड १, अंजनगाव १ अशी पाच घरे पूर्णत: कोलमडली.

---------------------

३२५ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान

पावसामुळे सर्वाधिक धामणगाव रेल्वे तालुक्यात १२० हेकटरमध्ये नुकसान झाले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ९२, मोर्शी २०, वरूड ७८, अंजनगाव सुर्जी १५ अशा पाच तालुक्यात ३२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे.

------------