शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मेळघाटात पुन्हा पावसाचे थैमान; ४० गावे ‘नॉट रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:42 IST

तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने सिपना व तापी व गडगा नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिमाणी ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मेळघाटात पोहोचली आहे.

ठळक मुद्देबैरागडचा पूल पाण्याखाली : रुग्णवाहिका अडकली, शाळांना सुटी, अतिसतर्कतेचा इशारा

पंकज लायदे/श्यामकांत पांडेय।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने सिपना व तापी व गडगा नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिमाणी ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मेळघाटात पोहोचली आहे. ४८ तासांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने सर्व माध्यमाच्या शाळांना सुटी देण्यात आली. दरम्यान, दिया, उतावली गावाजवळील पुलावरून सिपना नदीचे पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांना अतिसतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. दिया-बैरागड व कुसुमकोट- राणीगाव या मार्गावरील नागरिकांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.मंंगळवार मध्यरात्रीपासून पावसाने चांगला जोर धरल्यामुळे मेळघाटातील सिपना, गडगा, तापी या मुख्य नद्यांसह परिसरातील नदी-नाले ओसांडून वाहत आहे. गुरुवारी सकाळी अतिपावसामुळे दिया गावाजवळील सिपना नदीवरील पूल व धारणीपासून पाच किलोमीटर अंतरावरील रोहणीखेडा गावाजवळील गडगा नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने दोन्ही मार्गावरील ४० पेक्षा अधिक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. या मेळघाटातील तलाव ओवरफ्लो झाले आहेत. अतिपावसामुळे तलावातील पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे परिसरातील गावांना महसूल प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्याचे लेखी पत्र व मुनादी देण्याची सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिली आहे. धारणी तालुक्यातील धारणी महसूल मंडळात १०८.२ मिमी, सावलीखेड्यात १३६ मिमी, धूळघाट १२६ मिमी, हरिसाल मंडळात १३० मिमी पाऊस पडला. तालुक्यातील खारी, रबांग, नांदुरी, लवादा , गावलांडोह, मांडवा, जुटपानी हे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ७६६.३ मिमी पावसाची नोंद झाली. चौराकुंड ते खोकमार मार्गावरील नदीचा पूल वाहून गेला. हा पूल गुगामल वन्यजीव अंतर्गत चौराकुंड व्याघ्र प्रकल्पाच्या अति दुर्गम जंगलात असल्यामुळे माहिती मिळू शकली नाही. भवर नदीवरील पुलाच्या कडा तुटल्याने दुचाकीचीच वाहतूक होत आहे.या गावांचा तुटला संपर्कदिया गावाजवळच्या सिपना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने उकुपाटी, निरगुडी, धारणमहू, केकदाबोड, चटवाबोड, भोंडीलावा, बैरागड, खामदा, खोकमार, हरदा या गावांचा संपर्क तुटला. उतावली गावाजवळून वाहणाऱ्या सिपना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पोहरा, हदोर्ली, चाकरदा, कारादा, पाटिया, आठनादा या गावांचा संपर्क तुटलेला आहे . गडगा नदी ओसंडून वाहत असल्यामुळे रोहणीखेडा येथील पूल पाण्याखाली आला. परिणामी रोहिणीखेडा, बोबदो, दाबिदा, खारी, अंबाडी, नागोठणा, झिल्पी, साद्रावाडी, सुसर्दा, सावलीखेडा, राणीगाव आदी ४० गावांचा संपर्क तुटला. चिखली रस्त्यावर सिपना नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने चिखली,कारा,नांदुरी, कोट, तारूबांदा, आढाव ही संपर्काबाहेर आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर