शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-नरखेड मार्गावरील वलगाव येथे रेल्वे ट्रॅक तुटला; दोन मेमू ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 17:18 IST

वलगाव रेल्वे फाटकाजवळ ट्रॅक तुटल्याची बाब नरखेड रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीतील गार्डच्या निदर्शनात आली.

ठळक मुद्देमालगाडी गेल्यानंतर झाली घटना

गणेश वासनिकअमरावती : नजीकच्या वलगाव रेल्वे फाटकाजवळ नरखेड येथे रेल्वे ट्रॅक तुटल्याची घटना शनिवारी सकाळी १२.१० वाजता दरम्यान निदर्शनास आली. मालगाडी गेल्यानंतर ही घटना घडल्यानंतर रेल्वे ट्रॅक तुटला, अन्यथा मोठ्या अपघाताच्या सामोरे रेल्वे प्रशासनाला जावे लागले असते, या घटनेमुळे दोन मेमू ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले, हे विशेष.

वलगाव रेल्वे फाटकाजवळ ट्रॅक तुटल्याची बाब नरखेड रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीतील गार्डच्या निदर्शनात आली. ही माहिती गार्डने वलगाव रेल्वे प्रबंधकाला कळविली. ट्रॅक तुटल्याने पुढे अप्रिय घटना घडू नये, यासाठी वलगाव रेल्वे स्थानकाचे प्रबंधकांनी बडनेरा रेल्वे लोकोफोरमन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तासाभराने तुटलेल्या ट्रॅकचे काम युद्धस्तरावर सुरू झाले. प्राथमिक स्तरावर तुटलेल्या ट्रॅकची दुरूस्ती झाल्यानंतर भुसावळ -नरखेड आणि नरखेड - भुसावळ या दोन्ही मेमू ट्रेनला अडीच तासांनंतर पुढे सोडण्यात आल्याची माहिती आहे. मेमू ट्रेन गेल्यानंतरही तुटलेल्या ट्रॅकचे काम सुरूच होते, असे एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वे ट्रॅकचे झाले दोन तुकडे

नरखेड मार्गावरून मालगाडी गेल्यानंतर वलगाव फाटकाजवळ रेल्वे ट्रॅक तुटलेला असल्याची माहिती मालगाडीतील गार्डने वलगाव रेल्वे स्टेशन प्रबंधकांना दिली. रेल्वे ट्रॅकचे दोन तुकडे झाल्यामुळे पुढे प्रवासी गाडी गेल्यास मोठी जीवितहानी होईल, ही बाब गार्डच्या लक्षात आली. लागलीच रेल्वे प्रशासनाने काही वेळाने बडनेरा येथील रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर पाच तास ट्रॅक दुरूस्तीचे काम सुरूच होते. ट्रॅक दुरूस्तीपर्यंत मेमूमधील प्रवाशांना प्रतीक्षा

नरखेड मार्गावर वलगाव येथे रेल्वे ट्रॅक तुटल्याने थांबविण्यात आलेल्या दोन मेमू ट्रेनमधील प्रवाशांना पुढे प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. प्राथमिक स्वरूपात ट्रॅक दुरूस्ती होईस्तोवर अडीच तासांपर्यंत मेमू ट्रेन थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना वलगाव परिसरात नरखेड रेल्वे मार्गावरच मेमू ट्रेनमध्ये थांबावे लागले.

टॅग्स :railwayरेल्वेAmravatiअमरावती