शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नवाथेनगर येथे अवैध सावकाराकडे धाड; वर्षभरात २२ धाडसत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:18 IST

सहकार'ची कारवाई : खरेदीखत मिळाल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सहकार विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने नवाथेनगरातील एका अवैध सावकाराकडे गुरुवारी धाड टाकली. यात मुद्रांक व २४ स्थावर मालमत्तेचे खरेदीखत व दहा ७/१२ मिळाल्याची माहिती पथकाने दिली.

तिवसा सहायक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या निर्देशाने पथकाचे गठन करण्यात आले होते. यात अमरावती तालुका सहायक निबंधक सचिन पतंगे यांच्या नेतृत्वात गुरूवारी नवाथेनगरातील गल्ली क्रमांक ४ मधील गजानन लसनकर यांच्या घरी पथकाने धाड टाकली. यावेळी ते अनुपस्थित होते. त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत पथकाने घराची तपासणी केली. त्यात काही मुद्रांक, स्थावर मालमत्तेच्या २४ खरेदीखत, दहा शेताचे सात बारा त्यात काही मुळ प्रति मिळाल्याचे सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी सांगितले. या पथकात तिवसा सहायक निबंधक कार्यालयाचे मनोज रोहनकर, अजहरखान, शितल राठोड व राजापेठ पोलिस ठाण्यातील अंमलदारांचा समावेश होता. कागदपत्रांची अवैध सावकारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात येईल व त्यानंतर सुनावणी होणार असल्याचे सहकार विभागाने 'लोकमत'ला सांगितले. 

सहकार विभागाच्या वर्षभरात २२ धाडसत्र अवैध सावकारीवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली गत ११ महिन्यांत २२ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यात धामणगाव रेल्वे तालुक्यात ५ (एक मंगरूळ दस्तगीर), नांदगाव खंडेश्वर १ (यवतमाळ जिल्ह्यकातील दारव्हा तालुक्यात वर्ग), मोर्शी तालुक्यात २, अमरावती तालुक्यात पोहरा बंदी १ आणि अमरावती शहरात १५ पेक्षा जास्त अवैध सावकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरासह गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी सुरू असताना पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. अवैध सावकारांमुळे अनेकांची घरे, शेती, प्लॉट आदी मालमत्ता बळकावण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती