शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सहकार विभागाचे धाडसत्र, अवैध सावकारांचे धाबे दणाणले; खरेदीखत, कोरे मुद्रांक, शेती करारनामा जप्त

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 13, 2023 17:55 IST

मोर्शी, धामणगाव तालुका चर्चेत :

अमरावती : निवडणुकीच्या लगबगीचे कामकाज आटोपल्यानंतर सहकार विभाग पुन्हा कामाला लागला आहे. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने मोर्शी व धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे अवैध सावकारीच्या संशयावरून दोन घरी व दुकानामध्ये बुधवारी धाडसत्र राबविले. यामध्ये खरेदीखत, कोरे मुद्रांक, शेती करारनामा जप्त याशिवाय अवैध सावकारीच्या संबंधित कागदपत्रे सापडल्याने सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी सांगितले.

सहकार विभागाला प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी सहायक निबंधकांना प्राधिकृत केले व त्यांनी पथक स्थापन करून छापासत्र राबविले. यामध्ये तळेगाव दशासर येथील विनोद दादाराव देशमुख यांचे घरी, दुकानात व संबंधित दवाखान्यात तीन पथकांनी छापा टाकला. 

अंजनगाव सुर्जी सहायक निबंधक यांच्याकडे मोर्शी येथील अवैध सावकारी संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी मोर्शी एआर राजेंद्र भुयार, नंदकिशोर दहीकर, सुस्मिता सुपले यांचे पथक स्थापन केले व त्यांनी राधाकृष्ण कॉलनीतील अरविंद नामदेवराव गेडाम यांच्या घरी छापा टाकला.

टॅग्स :raidधाडAmravatiअमरावती