शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

रघुवीरचे दर सर्वाधिक, तरीही ‘सेल्फ सर्व्हिस’

By admin | Updated: September 19, 2016 00:10 IST

रघुवीर प्रतिष्ठानामध्ये कचोरीत आढळलेल्या अळीने तेथील खाद्यान्न खात्रीदायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे;...

पाण्यासाठी उष्टे ग्लास : ग्राहक हक्क संरक्षण कायद्याचे दररोज उल्लंघनअमरावती : रघुवीर प्रतिष्ठानामध्ये कचोरीत आढळलेल्या अळीने तेथील खाद्यान्न खात्रीदायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे; तथापि सर्वाधिक दर आकारूनही या प्रतिष्ठानात ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविली जात नाही. योग्य व समाधानकारक सेवा हा ग्राहक हक्क व संंरक्षण कायद्यानुसार ग्राहकांचा हक्क आहे. मात्र, ग्राहकांसाठी असलेल्या या कायद्याचे 'रघुवीर'कडून सातत्याने उल्लंघन होत आहे. खाद्यपदार्थांच्या विक्रीचा थेट संबंध ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित आहे. खाद्यान्न विक्रेत्यांवर विश्वास ठेवूनच ग्राहक हे पदार्थ खरेदी करतात. मात्र, प्रतिष्ठित रघुवीरच्या कचोरीत आढळलेली अळी ग्राहकांच्या त्या विश्वासाला तडा देणारी ठरली आहे. तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे. बुधवारा येथील बंडू बाबरेकर यांनी रघुवीरमधून कचोरी घेतली आणि त्या कचोरीत अळी आढळून आली. त्यांनी आल्या पावली परत फिरून रघुवीरच्या संबंधित कर्मचाऱ्याला अळी असलेली कचोरी दाखविली. त्याने लागलीच कचोरी ताब्यात घेतली. चुकीची कबुली दिली. मात्र, त्यांना पैसे परत केले नाहीत किंवा त्या मोबदल्यात दुसरा नाश्ता देण्याचे सौजन्यदेखील दाखविले नाही. ग्राहक हक्क व संरक्षण कायद्यात ग्राहकांना योग्य सेवा पुरविणे, व्यावसायिकांना बंधनकारक आहे. ग्राहकांना वस्तू किंवा खाद्यान्न विक्री करताना ग्राहकांचे समाधान होणे, ग्राहकांशी योग्य व्यवहार व वागणूक देणे या बाबी कायद्यात नमूद आहेत. मात्र, रघुवीरमधून कचोरी विकत घेणाऱ्या ग्राहकाचे समाधान तर झाले नाहीच. उलट त्याचे पैसे सुद्धा परत देण्यात आले नाहीत. ही बाब ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारीच आहे. दर्जेदार नाश्त्याचा दावा करणाऱ्या ‘रघुवीर’मध्ये समाधान होत नसल्याचा अनुभव आलेल्या अनेकांनी त्यांचे अनुभव मुद्दामच 'लोकमत'शी शेअर केलेत. यात डॉक्टर्स, अधिकारी, सामान्य नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. ग्राहक शेकडो, पाणी पिण्यासाठी ग्लास दोनरघुवीरमध्ये ग्राहकांसाठी जेथे पाण्याची सोय करण्यात आली, तेथे एक किंवा दोन ग्लास पाणी पिण्यासाठी ठेवण्यात येतात. दररोज शेकडो ग्राहक या दोनच प्याल्यांनी पाणी पितात. ग्राहकांना त्यातून आजार संक्रमित होतो. रघुवीरमध्ये जाणारी कुणीही व्यक्ती त्यांच्या स्वत:च्या घरी कुण्या दुसऱ्या व्यक्तीने उष्टा केलेल्या प्याल्याने पाणी पीत नसतीलच; तथापि रघुवीरमध्ये मात्र अवघ्या अमरावतीत सर्वाधिक दर देऊन बहुतांश ग्राहक हक्क विसरून उष्ट्या प्याल्याने पाणी पितात. फार फार तर प्याला विसळून घेतात. जे प्याले ग्राहकांसाठी ठेवले जातात, त्याच प्याल्यांनी रघुवीरचे मालक पाणी का पीत नाहीत? जे स्वत:ला चालत नाही, ते इतरांना पैसे आकारूनही का दिले जाते? ग्राहक हक्क व संरक्षण कायद्यानुसार व्यापाऱ्यांनी ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविणे व योग्य वागणूक देऊन त्यांच्याशी सौजन्यपूर्ण व्यवहार करणे बंधनकारक आहे. रघुवीरमध्ये स्वयंसेवा आहे आणि ग्राहकांना योग्य सुविधा, वागणूक नसणे ही बाब कायद्याचे उल्लघंन करणारी आहे.- अजय गाडे, जिल्हा संघटक मंंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत