शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात ‘त्या’ तीन महिलांची रडारड, मुलांना जाणून काढले चिमटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

दरम्यान, २९ मे रोजी नोंदविलेल्या ३.७५ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी त्या तीनही महिलांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी क्रमांक १० यांच्या न्यायालयात करण्यात आली. त्यावर उपनिरीक्षक सचिन माकोडे यांची पेशी सुरू असताना पहिल्या महिला आरोपीने न्यायालयात हजर होताच तिच्या काखेत घेतलेल्या मुलाला स्वतः चिमटा घेऊन त्या मुलाला रडवले. न्यायालयीन कामकाजात सर्वांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.  

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: चोरीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळावी, या मागणीसाठी हजर केलेल्या तीन  महिलांनी न्यायालयात भोकांड पसरले. त्यांनी स्वत:कडील मुलांना जाणूनबुजून चिमटे काढून रडविले. न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण झाला. २ जून रोजी दुपारी ४.४५ च्या सुमारास न्यायालय क्रमांक १५ मध्ये ही घटना घडली.याप्रकरणी गाडगेनगर ठाण्यातील उपनिरीक्षक सचिन माकोडे यांच्या फिर्यादीवरून गाडगेनगर पोलिसांनी त्या तीन महिलांविरुद्ध भादंविचे कलम १८६ व बालन्याय अधिनियमाच्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल केला. त्या तीनही महिलांना सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करून बालकास क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आठवड्यापूर्वी गाडगेनगर पोलिसांनी बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यात औरंगाबाद येथील तीन महिलांना अटक केली होती. त्यांना फिर्यादी महिलांनी ओळखले. पुढे न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी झाली. दरम्यान, २९ मे रोजी नोंदविलेल्या ३.७५ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी त्या तीनही महिलांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी क्रमांक १० यांच्या न्यायालयात करण्यात आली. त्यावर उपनिरीक्षक सचिन माकोडे यांची पेशी सुरू असताना पहिल्या महिला आरोपीने न्यायालयात हजर होताच तिच्या काखेत घेतलेल्या मुलाला स्वतः चिमटा घेऊन त्या मुलाला रडवले. न्यायालयीन कामकाजात सर्वांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.  

सर्वांसमक्ष घडला प्रकारथोड्या वेळानंतर दुसऱ्या महिला आरोपीनेदेखील तिच्या काखेवरील बाळाला चिमटा घेऊन रडवले. त्यावेळी  सरकारी वकील वासुकार यांनी तिला बघितले. तेथे त्यावेळी गाडगेनगर ठाण्याचे कोर्ट पैरवी कर्मचारी डोईजोड, आरोपीचे वकील, न्यायालयातील लिपिक, शिपाई आणि अन्य काही वकील होते. त्यांच्या समक्ष हा प्रकार घडला. पोलीस कोठडी मिळू नये, म्हणून  तिन्ही महिला या कोर्टपेशी सुरू असताना रडायला लागल्या.  त्यांनी न्यायालयीन कामकाजाला अटकाव केला तथा दोन महिला आरोपींनी  स्वत:जवळील बालकांना क्रूरपणे वागणूक दिल्याची तक्रार पोलीस उपनिरीक्षक सचिन माकोडे यांनी नोंदविली.  

न्यायालयीन पेशीदरम्यान तीनही महिला आरोपी रडल्या. पैकी दोघींनी स्वत:कडील मुलांना चिमटा घेऊन रडविले. तिघींनाही अटक करण्यात आली. ३.७५ लाखांच्या चोरीप्रकरणात त्यांचा पीसीआर मागण्यात आला होता.- आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर

 

टॅग्स :Thiefचोर