अमरावती : दसरा मैदान झोपडपट्टीत रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही गुडांनी लाठ्याकाठ्या व लोंखडी पाईपने हल्ला करुन एका कुटुबांतील दोन जणांना जखमी केले. या हल्यात ज्ञानेश्वर गणपत वानखडे व त्यांची पत्नी जखमी झाली. घटनेनंतर दोन गटात हाणामारी सुरु झाल्याने गोंधळ उडाला होता. राजापेठ पोलिसांनी दोन्ही गटांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान येथील ज्ञानेश्वर वानखडे यांच्या पत्नीला आरोपी पटेल बावरी, गज्जू बावरी व बनवारी नामक युवकांनी मद्यधुंद अवस्थेत शिविगाळ केली. ज्ञानेश्वर वानखेडे यांनी विरोध केला असता आरोपींनी संगनमत करुन वानखेडे दाम्पत्यावर लाठ्याकाठ्या व लोखंडी पाईपने हल्ला चढविला. हा गोंधळ सुरु असतानाच वानखेडे यांचे काही सहकारी एकजुटीने समोर आले. यावेळी दोन्ही गटात हाणामारी सुरु झाली होती. घटनेची माहिती राजापेठ पोलिसांनी मिळताच पोलिसांचा ताफा दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीत दाखल झाला. पोलिसांनी तणावग्रस्त स्थितीवर नियंत्रण मिळविले तसेच दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन्ही गटांनी एकमेकांविरुध्द तक्रारी नोंदविल्या. ज्ञानेश्वर वानखेडेंच्या तक्रारीहून पोलिसांनी आरोपी पटेल बावरी, गज्जू बावरी व बनवारी विरुध्द तर अंजू अजय बावरीच्या तक्रारीहून ओम वानखेडे, राजू वानखेडे, नीलेश गायकवाड, ज्ञानेश्वर वानखेडे विरुध्द कलम ३२४, ३४नुसार गुन्हा नोंदविला
दसरा मैदान झोपडपट्टीत राडा, तणावाची स्थिती
By admin | Updated: January 5, 2015 22:54 IST