शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

सुरक्षा रक्षकांच्या खिशावर ४० लाखांचा डल्ला

By admin | Updated: January 3, 2017 00:09 IST

महापालिकेला सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ या संस्थेने महापालिका आणि सुरक्षारक्षकांच्या खिशावर सुमारे ४० लाख रूपयांचा डल्ला मारला आहे.

रक्कम वसूल करणार ? : ‘अमृत’वर कारवाई की अभय अमरावती : महापालिकेला सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ या संस्थेने महापालिका आणि सुरक्षारक्षकांच्या खिशावर सुमारे ४० लाख रूपयांचा डल्ला मारला आहे. ही आकडेवारी फेब्रुवारी ते आॅगस्ट या कालावधीतील असून डिसेंबरपर्यंत हिशेब धरल्यास याभ्रष्टाचारात मोठी वाढ होऊ शकते. मनपाकडून प्रतीसुरक्षारक्षक मिळणाऱ्या ८७२६ रूपयांपैकी आपण २५.६१ टक्के ईपीएफ, ६.५० टक्के इएसआयसी १५ टक्के सेवाकर आणि अन्य अधिकार म्हणून २ टक्के अशी एकत्रित कपात करीत असल्याचा ‘अमृत’चा दावा आहे. देयकासोबत हा हिशेब सामान्य प्रशासन विभागाकडे सादरही केला जातो. प्रत्यक्षात इपीएफ, ईएसआयसी आणि सेवाकर करारनाम्याप्रमाणे भरण्यातच आलेला नाही. एप्रिल ते जुलै महिन्यात ‘ईपीएफ’चा भरणा करण्यात आला नाही. फेब्रुवारी, मार्च आणि आॅगस्टमध्ये भरणा केलेल्या ईपीएफची रक्कमसुद्धा अल्प आहे. ईपीएफ, इएसआयसी आणि सेवाकर मिळून ‘अमृत’ने महापालिका व आपल्याच सहकारी सुरक्षारक्षकांना ३९ लाख ९३ हजार ३३५ रूपयांनी नाडवले आहे. ‘अमृत’ सहकारी संस्थेने आपल्याच संस्थेतील सहकाऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. फेब्रुवारी ते आॅगस्ट या सात महिन्यांच्या कालावधीत ‘अमृत’ला ११०१ सुरक्षारक्षकांच्या मानधनापोटी ९६ लाख ७३२६ रुपये अदा करण्यात आले.करारनाम्यानुसार त्यातील २५.६१ टक्के रक्कम ईपीएफ कपात करणे अनिवार्य आहे. अर्थात एकूण देयकांपैकी २४ लाख ६० हजार ४३६ रुपये ईपीएफमध्ये भरणे बंधनकारक होते. मात्र, फेब्रुवारी, मार्च, आॅगस्ट या तीन महिन्यात इपीएफपोटी केवळ ४ लाख ५० हजार ५१० रुपये भरण्यात आले आहेत. भरणा केलेली ही रक्कम २५.६१ च्या तुलनेत केवळ ८ टक्के आहे. सुरक्षारक्षकांच्या मानधनातून मात्र संपूर्ण २५.६१ टक्के रक्कम कपात करण्यात आली. अर्थात येथे २० लाख ९९२५ रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला. एप्रिल ते जुलै या महिन्यात ईपीएफची रक्कम भरलेली नाही. राज्य कामगार विमा निगम अर्थात ईएसआयसीपोटी ६.५० टक्के अंशदान कपात करण्यात येईल, असे करारनाम्यात नमुद आहे. फेब्रुवारी ते आॅगस्ट या सात महिन्यात एकूण ११०१ सुरक्षारक्षकांचे मानधन देण्यात आले. ५.४२ लाखांचा अपहार अमरावती : ६.५० टक्के दराने ही कपात ६ लाख २४ हजार ४७६ रुपये होती. तेवढीच कपात सुरक्षारक्षकांच्या मानधनातून करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात फेब्रुवारीमध्ये ३३,५५८ रुपये व आॅगस्टमध्ये ४८५०९ रुपयांचा भरणा करण्यात आला. हे एकत्रित ८२ हजार ०६७ रुपये भरण्यात आले. येथे ५ लाख ४२ हजार ४०९ रूपयांचा अपहार करण्यात आला. ७ महिन्यात १,३९,९६५ रूपये आयकर कपात गेली गेली. मे आणि जूनमध्ये कपात झाली नाही, हे एक कोडेच आहे. मे आणि जूनमध्ये अधिभार कपातही केली नाही. एकूण देयकातून १,३९,९६५ रूपये आयकर व १६,७९६ रूपये अधिभार कपात करण्यात आला. या आर्थिक अनियमिततेला जबाबदार कोण हे अतिरिक्त आयुक्तांच्या अहवालाअंती स्पष्ट होणार आहे. या अहवालाकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.