शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेसर बाईकचे पोलिसांकडून व्हेरीफिकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:28 IST

शहरात स्टंट राईडरच्या धुमाकुळाने झालेल्या अपघाताची पार्श्वभूमी पाहता पोलिसांकडून रेसर बाईकचे व्हेरीफिकेश केले जाणार आहे.

ठळक मुद्देस्टंट राईडरच्या हॉटस्पॉटवर लक्ष : स्टंटबाज पुन्हा रडारवर

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरात स्टंट राईडरच्या धुमाकुळाने झालेल्या अपघाताची पार्श्वभूमी पाहता पोलिसांकडून रेसर बाईकचे व्हेरीफिकेश केले जाणार आहे. स्टंट राईडर ज्या कॅफे हॉटस्पॉटवर थांबतात, तेथे पोलीस नजर ठेवून राहणार आहे. 'लोकमत' ने स्टंटबाजी करणाऱ्यांचे कारनामे लोकदरबारी मांडताच पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता पुन्हा स्टंटबाज पोलिसांच्या रडारवर आले आहेत.पोलीस आयुक्तालय हद्दीत धोकादायक वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम १८ सप्टेंबर रोजी शहरात चालविण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी तब्बल ४१९ वाहनांवर रॅश ड्राईव्हिंगच्या केसेस केल्यात. रेसर बाईकस्वारांना चलान देऊन २ लाख ४७ हजार ७४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. सोबत वाहनचालकांच्या पालकांना बोलावून त्यांना समजसुद्धा देण्यात आला होता. त्यावेळी स्टंटबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. मात्र, आता पुन्हा स्टंट राईडर अ‍ॅक्टीव्ह झाल्याचे राजापेठ हद्दीत घडलेल्या अपघातांच्या घटनांवरून निदर्शनास आले आहे. यासंबंधाने 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून स्टंट राईडरचे कारनामे उघड केले. त्या अनुषंगाने या स्टंटराईडरचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पावले उचलली आहेत. स्टंट राईडींग करणारे हे तरुण शहरातील विविध कॅफे, गार्डन किंवा निवांत ठिकाणाचा सहारा घेतात. मुलींना आकर्षित करण्यासाठी रेसर बाईकवर स्टंटबाजी करतात. लब्धप्रतिष्ठित आई-वडिलांकडून गिफ्ट म्हणून मिळालेली रेसर बाईक धूम स्टाईलने रस्त्यावर पळवितात. त्यांना आईवडिलांचे प्रोत्साहन मिळत असल्यामुळे हे तरुण शहरात बेफाम वाहने चालवून स्टंटबाजीसुद्धा करतात. त्यांचे हे कारनामे अन्य वाहनचालकांना धोकादायक ठरत असल्याची पुसटशी कल्पनाही हे स्टंट राईडर करीत नाही. मात्र, आता हे स्टंटराईडर पुन्हा पोलिसांच्या रडारवर आले असून त्यांच्या रेसर बाईकचे व्हेरिफिकेशन पोलीस करणार आहेत. या मुलांची सर्व माहिती गोळा करून त्यांच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावणार आहेत.