शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील लांडग्यांना रेबिज; वाघांवरही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 07:00 IST

Amravati News मेळघाटच्या धारणी तालुक्यात रेबिजमुळे लांडगा चवताळल्याची धक्कादायक माहिती आहे. यामुळे जंगलातील वाघ, बिबट व इतरही वन्यप्राण्यांना धोका होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

 

नरेंद्र जावरे

अमरावती : मेळघाटच्या धारणी तालुक्यात चिपोली परिसरात ४० पेक्षा अधिक नागरिकांना चावा घेणाऱ्या मृत लांडग्याचा अहवाल बंगळुरु येथील प्रयोगशाळेतून वनविभागाला प्राप्त झाला आहे. रेबिजमुळे लांडगा चवताळल्याची धक्कादायक माहिती त्याद्वारे पुढले आली आहे. यामुळे जंगलातील वाघ, बिबट व इतरही वन्यप्राण्यांना धोका होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. यादरम्यान वन आणि व्याघ्र प्रकल्पात चार वनपरिक्षेत्र अधिकारी व ५० कर्मचारी रात्रंदिवस गस्तीवर असून, गावानजीक चवताळलेला लांडगा आढळल्यास तात्काळ ट्रँक्यूलायझरचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या धूळघाट रेल्वे-धारणी परिक्षेत्रात मागील महिन्यात दोन लांडग्यांनी धुमाकूळ घातला. १५ दिवसापूर्वी २७ जणांना चवताळलेल्या लांडग्याने चावा घेतला. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी लांडग्याला ठार केले होते. त्यामुळे दहशत संपली, असे नागरिकांना वाटत असतानाच धारणी व परिसरात पुन्हा शनिवार व रविवार असे दोन दिवस चवताळलेल्या लांडग्याने आठपेक्षा अधिक जणांना चावा घेतला. त्यात एका बालकाचाही समावेश आहे. धारणीनजीकच्या बासपानीजवळ दुपारी लांडगा मृतावस्थेत आढळला असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी शुभांगी डेहनकर यांनी सांगितले. धारणीचे पशुवैद्यकीय अधिकारी मनोज आडे, जी.एम. वानखडे, वैभव पाटील यांनी शवविच्छेदन केले व प्रयोगशाळेत शरीरातील नमुने पाठविण्यात आले. खबरदारीची उपाययोजना केली जात असून, गावागावांत मुनादी, पोस्टर लावून जनजागृती केली जात आहे. मांडवा, बासपाणी, बोबदो, टिटंबा, जुटपाणी, राणीतंबोली, टेंभली गावांमध्ये आदिवासींच्या सहकार्याने मोहीम सुरू आहे.

अहवालामुळे वाढली धाकधूक

चिपोलीनजीक मृतावस्थेत आढळलेल्या लांडग्याचा प्रयोगशाळेतील अहवाल वनविभागाला प्राप्त झाला. त्याला रेबिज झाल्याचे स्पष्ट करण्यात आले, तर सोमवारी दुपारी मृतावस्थेत आढळलेला लांडगासुद्धा तशाच प्रकारचे लक्षणे असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात बंगळुरु येथील प्रयोगशाळेत नमुने पाठविला जात असल्याचे स्पष्ट केले.

वाघ, बिबटेही धोक्यात

चवताळलेल्या दोन लांडग्यांचा नागरिकांना चावा घेण्याचे किमान २२ दिवसांचे अंतर आहे. नागरी वस्तीत येऊन नागरिकांना चावा घेत असताना मेळघाटच्या अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वाघ, बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांनासुद्धा या चवताळलेल्या लांडग्यांपासून धोका निर्माण झाला आहे.

चार आरएफओ, ५० कर्मचारी गस्तीवर

मेळघाट व्याघ्र प्रकल्प व प्रादेशिक वनविभागातील वनपरिक्षेत्रात धूळघाट रेल्वे/सुसर्दा आरएफओ शुभांगी डेहनकर, धारणी आरएफओ पुष्पा सातारकर, ढाकणा आरएफओ ठाकरे व ट्रँक्यूलायझेशन टीमचे आरएफओ राजेश महल्लेसह ५० कर्मचारी रात्रंदिवस गस्तीवर आहेत. मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, उपवनसंरक्षक गिन्नी सिंग प्रत्येक हालचालीबद्दल माहिती घेत आहेत.

वीस दिवसापूर्वी चिपोली येथे मृतावस्थेत आढळलेल्या लांडग्याचा प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाला. रेबीज असल्याचे स्पष्ट आहे. सोमवारी दुसरा लांडगा मृतावस्थेत आढळला. दोघात २२ दिवसांचे अंतर आहे. गावागावांमध्ये मुनादी दिली जात आहे. शिवारावर चवताळलेला लांडगा दिसताच बेशुद्ध करण्यासाठी रात्रंदिवस गस्त होत आहे. चार अधिकारी व ५० कर्मचारी यासाठी तैनात आहेत. वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

- शुभांगी डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, धुळघाट रेल्वे /सुसर्दा, ता. धारणी

बासपाणी येथे मृतावस्थेत आढळलेल्या लांडग्याचे शवविच्छेदन तीन डॉक्टरांच्या चमूने केले. प्राथमिकदृष्ट्या रेबीज असल्याचा अंदाज आहे. बंगळुरु येथील प्रयोगशाळेतून अहवाल आल्यावर खरे कारण स्पष्ट होईल. नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने कळविले जात आहे.

- मनोज आडे, पशुवैद्यकीय अधिकारी, धारणी

टॅग्स :wildlifeवन्यजीव