शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मेळघाटचे प्रश्न राज्यपालांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:15 IST

मेळघाटातील विविध समस्या कायमच्या सुटाव्यात तसेच कुपोषण हद्दपार व्हावे, यासाठी आ. रवि राणा यांनी बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.

ठळक मुद्देरवि राणांचा पुढाकार : रोजगार, पर्यटन वाढीवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील विविध समस्या कायमच्या सुटाव्यात तसेच कुपोषण हद्दपार व्हावे, यासाठी आ. रवि राणा यांनी बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. आदिवासींची कैफियत मांडताना राणांनी रोजगार, पर्यटन वाढीसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधीची मागणी केली.आदिवासींचा विकास, समस्यांचे निराकरण होत नसेल तर ही जबाबदारी राज्य घटनेनुसार राज्यपालांकडे सोपविली आहे. त्याअनुषंगाने आ. राणांनी विकासापासून कायम वंचित असलेल्या मेळघाटच्या विकासासाठी राज्यपालांकडे धाव घेतली. मेळघाटात वनवैभव, व्याघ्र प्रकल्प, पर्यटन वाढीस चालना, आयुर्वेदिक वनौैषधी साठा असताना विकास का झाला नाही? याबाबतची कैफियत राज्यपालांच्या दरबारात मांडली. तब्बल तासभर चालेल्या चर्चेत आ. राणांनी राज्यपालांंना मेळघाट आपण दत्तक घेऊन आदिवासींना न्याय प्रदान करावा, अशी मागणी केली. रस्ते, गावांचा कायापालट करताना आदिवासींना पायाभूत सुविधा देण्याबाबतही त्यांनी आर्जव केले. महसूल उत्पन्नाच्या २५ टक्के वाटा हा मेळघाटातील ग्रामपंचायतींना देण्याबाबतची मागणी केली. मेळघाट कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असून हा कलंक दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विकासासाठी भरीव निधी द्यावा, चिखलदरा पर्यटनासाठी निधी मिळावा, बेलोरा विमानतळाचा विकास, धारणी प्रकल्प कार्यालयात वरिष्ठ आयएएस अधिकारी नियुक्त करण्यात यावे, दळण- वळणाच्या सोईसुविधा, शिक्षण, आरोग्याचे प्रश्न सुटावेत आदी समस्या, प्रश्नांवर राज्यपालांचे आ. राणांनी लक्ष वेधले. दरम्यान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सचिव आणि उपसचिवांना मेळघाट समस्यांबाबत नोंद घेण्याचे कळविले. यासंदर्भात राज्य शासनाला अंमलबजावणीच्या कार्यवाहीसाठी आदेशित करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Melghatमेळघाट