शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' शासकीय कंपनीच्या कार्यालयातील जुगार कारवाईवर प्रश्नचिन्ह !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:39 IST

Amravati : पोळ्याच्या रात्री जुगाराचा खेळ; पाचशेच्या नोटा, जप्ती ६,९०० चीच?

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : पोळ्याच्या मध्यरात्री मोझरी येथील एका शासकीय कंपनीच्या कार्यालयात जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्यांकडून तिवसा पोलिसांना मिळाली. क्षणातच बीट जमादार चार कर्मचाऱ्यांसह जुगार अड्ड्यावर दाखल झाले. पोलिस दिसताच जुगाऱ्यांची त्रेधा उडाली. सर्व काही सोडून एकच पळापळ ज्यामध्ये झाली, एकजण नाहक गंभीर जखमी झाला तर अन्य एकाला गंभीर दुखापत झाली.

विश्वसनीय माहितीनुसार, पोलिस आले तेव्हा जुगाराचा डाव चांगलाच 'भारी' झाला होता. तो सोडून जुगारी पळाले. एवढेच नव्हेतर, घटनास्थळाची झाडाझडती घेतली असता. त्यातही लाखो रुपये सापडले असल्याची चर्चा आहे. या धावपळीत पोलिसांच्या हाती लागलेल्या चार-पाच जणांकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी खबऱ्याच्या माध्यमातून लाख रुपयांची मांडवली करण्यात आली. घटनेची नोंद घेताना मात्र चाणाक्ष बीट जमादाराने बनाव रचून काल्पनिक हकिकत दाखल केली, ज्यामध्ये जुगार हा सार्वजनिक रस्त्यावर खेळला जात होता, असे नमूद करण्यात आले. सर्वात आश्चर्यजनक म्हणजे, जुगारात ६,९०० सापडल्याचे दाखविण्यात आले. डझनभर जुगारी खेळत असताना दोघांवर गुन्हा दाखल करून अन्य अज्ञात आरोपी फरार दाखविण्यात आले. या जुगाराची उलटतपासणी व्हावी, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. 

नोटा ५०० च्या, जप्त ६,९०० रुपये कसे?जुगारात पाचशेच्याच नोटा होत्या. शंभराच्या नोटांचा मुळी संबंध नव्हता, तर मग ६,९०० हा आकडा कोठून आला? धावपळीत पाचशेच्या नोटा खाली पडल्याने त्याची चिल्लर झाली असावी. पोळा हा सण बळीराजाचा, परंतु यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे अवसान गळाले. पण, या सणाने पोलिसांची ईडा-पीडा मात्र दूर केल्याची चर्चा आहे.

मुद्देमालात मोबाइलचा समावेश नाहीपोलिसांनी घटनास्थळावरून चार मोबाइल हस्तगत केले. परंतु, फिर्याद नोंदविताना जप्त मुद्देमालात समावेश का करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

"बीट अंमलदाराने कारवाई केली. त्यांना घटनास्थळी जे साहित्य व आरोपी मिळाले, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जुगाराबाबत होत असलेल्या चर्चेसंदर्भात व घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल."- गोपाल उपाध्याय, ठाणेदार, तिवसा.

टॅग्स :Amravatiअमरावती