शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

देशी दारु दुकानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; वडाळीत होणार मतदान!

By admin | Updated: November 17, 2014 22:43 IST

वडाळी येथील सध्या बंद असलेल्या देशी दारु दुकानासंदर्भात नव्याने मतदान घेतले जाईल. आता बाटली आडवी की उभी? हे प्रशासन सिद्ध करणार असून त्यानंतर या दुकानाबाबत निर्णय घेतला जाईल.

गणेश वासनिक - अमरावतीवडाळी येथील सध्या बंद असलेल्या देशी दारु दुकानासंदर्भात नव्याने मतदान घेतले जाईल. आता बाटली आडवी की उभी? हे प्रशासन सिद्ध करणार असून त्यानंतर या दुकानाबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, हे दारुचे दुकान सुरूच होऊ नये, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.वडाळी येथे झांबानी यांचे परवाना प्राप्त देशी दारु विक्रीचे दुकान आहे. मात्र, या दुकानामुळे कायदा, सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. महिला, युवती दुकानामुळे असुरक्षित असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यामुळे हे दुकान वडाळीतून कायमस्वरुपी हद्दपार करावे, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार १६ फे ब्रुवारी २०१४ रोजी मतदान घेण्यात आले. मात्र, मतदार यादीत घोळ असल्याने महिला मतदारांची नावे यादीत नव्हती. परिणामी ही मतदान प्रक्रिया दारु विक्रेत्याच्या इशाऱ्यावर ‘मॅनेज’ करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. ही मतदान प्रक्रिया नकोच, दुकानही सुरु होता कामा नये, अशी ठाम भूमिका घेत त्यावेळी वडाळीतील महिलाशक्ती एकवटली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पुढील आदेशापर्यत देशी दारुविक्रीचे दुकान सुरु करता येणार नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र, ९ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर या दुकानासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, असा अर्ज देशी दारु विक्रीचे परवानाधारक झांबानी यांनी राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाकडे केला आहे. विभागाला तसे पत्रसुद्धा मिळाले आहे. शासनाच्या पत्राची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातही पोहोचली आहे. दारू दुकानाबाबतची प्रक्रिया नियमानुसार करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या दुकानासंदर्भात नव्याने मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.वडाळीत यापूर्वी मतदार यादीवरुन उठलेले वादळ पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने विधानसभा निवडणुकीत प्रसिद्ध मतदार यादीबाबतचे आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले होते. महिलांच्या हाती निर्णयवडाळीतील एकाही मतदाराने हरकत दाखल केली नाही. त्यामुळे आता या दुकानाबाबत मतदान घ्यायचे झाल्यास विधानसभा निवडणुकीत मतदार यादीनुसार पार पाडले जाईल, अशी माहिती आहे. चार हजार महिला मतदार असलेल्या यादीनुसार पुढील मतदान प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे दारू दुकानासंदर्भात यापूर्वी एकदा मतदान झाले. आता नव्याने मतदान होईल. मात्र, वडाळीत बाटली आडवी की उभी? हा निर्णय महिलांच्या हाती राहणार आहे. देशी दारु विक्रेता परवानाधारक शासन, प्रशासन स्तरावर सर्वच घटनाक्रम आपल्या बाजूने कसे होईल, याचे सुक्ष्म नियोजन करीत आहेत. परंतु ज्या हक्कासाठी महिला एकवटल्या आहेत.