शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

राजापेठ ‘आरओबी’च्या आठ कोटी रुपयांच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: August 21, 2015 00:47 IST

राजापेठ येथे प्रस्तावित रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त ८ कोटी रुपयांच्या रक्कम उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला आहे.

निधी, वाटाघाटीत घोळ : रेल्वे फाटक कृती समितीचा आरोपअमरावती : राजापेठ येथे प्रस्तावित रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त ८ कोटी रुपयांच्या रक्कम उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला आहे. शासनाची परवानगी न घेता कंत्राटदारासोबत वाटाघाटी करण्यात आल्यात ही बाब भविष्यात शहरवासीयांची फसवणूक करणारी ठरेल, असा आरोप राजापेठ रेल्वे फाटक कृती समितीने केला आहे.राजापेठ रेल्वे फाटक कृती समितीचे अध्यक्ष मुन्ना राठोड यांनी आयुक्त गुडेवार यांना दिलेल्या निवेदनानुसार हा उड्डाणपूल निर्माण व्हावा, यासाठी मोर्चे, आंदोलन, चक्काजाम, बाजारपेठ यापूर्वी बंद करण्यात आल्या आहेत. रेल्वे, लोकप्रतिनींधीच्या पुढाकाराने उशिरा का होईना राजापेठ आरओबी निर्मितीचा मार्ग सुकर झाला. मात्र आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी नागपूर येथील चाफेकर अँड कंपनीला २५.७८ टक्के जादा दराने उड्डाणपूल निर्मितीचा कंत्राट सोपविताना ८ कोटी रुपयांची रक्कम कशी, कोठून उभारणार हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला कळविले नाही. वाटाघाटी करताना पहिल्या तीन कंत्राटदारांना चर्चेसाठी बोलाविले नाही, असा राठोड यांचा आरोप आहे. मूळ निविदेच्या रक्कमेपेक्षा ८ कोटी रुपये जास्त किमतीला प्रशासनाने मंजुरी दिली. तत्कालीन आयुक्तांनी १२ कोटींपेक्षा जास्त दराने निविदा आली असता ती शासनाच्या मार्गदर्शनासाठी पाठविली होती. कारण निविदेत तफावत असलेली रक्कम कोठून उभारणार हे प्रशासनाने स्पष्ट करणे अनिवार्य आहे. ‘आरओबी’ साठी शासनाकडून प्राप्त १० कोटींचा निधी बँकेत मुदत ठेव करुन त्यावर कर्ज घेण्यात आल्याचा आरोप आहे. ३२ कोटी रुपये ही रक्कम शासनाने मंजूर केली किंवा नाही, हे गुलदस्त्यात आहे. आरओबीमध्ये रेल्वे हद्दीतील बांधकामाला महापालिकेचा वाटा किती राहील, हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे मुन्ना राठोड म्हणाले.