शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मासोळीच्या शिकारीसाठी नदीत उतरलेला अजगर अडकला जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 20:56 IST

मासोळीला भक्ष्य करण्यासाठी बेंबळा नदीत उतरलेला अजगर जाळ्यात अडकला. वनविभाग व वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी अजगराला तीन दिवसानंतर जाळ्यातून मुक्तता केली.

 अमरावती  - मासोळीला भक्ष्य करण्यासाठी बेंबळा नदीत उतरलेला अजगर जाळ्यात अडकला. वनविभाग व वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी अजगराला तीन दिवसानंतर जाळ्यातून मुक्तता केली. वसाच्या रेस्क्यू सेंटरला त्याची तब्बल १७ दिवस शुश्रुषा केल्यानंतर जंगलात सोडण्यात आले. 

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावंगा (गुरव) गावाजवळून वाहणाºया बेंबळा नदीत मासोळी पकडण्याच्या जाळ्यात अजगर असल्याची माहिती वनविभागाच्या बडनेरा येथील कार्यालयास २५ मार्च रोजी तेथील रहिवासी नानकसिंग यांनी फोनद्वारे कळविली. त्यावरून सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल भटकर यांनी वसा संस्थेच्या रेस्क्यू हेल्पलाइनला माहिती देत वनरक्षक के.आर. धोत्रे आणि रेस्क्यूअर भूषण सायंके यांना पाचारण केले. तो तीन दिवसांपासून जाळ्यात अडकला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वनविभागाने भूषण सायंकेच्या मदतीने अजगराला जाळ्यातून सोडविले आणि नदीच्या बाहेर काढले. जखमी असल्याने त्या अजगरावर शासकीय पशवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर अजगराची वसा संस्थेच्या रेस्क्यू सेंटरमध्ये १७ दिवस योग्य काळजी घेतल्यानंतर त्याला शुक्रवारी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

जाळे कापले सदर अजगर नदीच्या मधोमध जाळ्यात अडकला होता. रेस्क्यूअर भूषण सायंके सर्व तयारीनिशी नदीत उतरले आणि मोठ्या शिताफीने नऊ फुटी अजगराला जाळ्यासहित पाण्याबाहेर काढले. यानंतर जाळे कापून अजगराची सुटका करण्यात आली. दोन ते तीन दिवसांपासून जाळ्यात अडकला असल्यामुळे अजगर जखमी झाल्याचे लक्षात आले.

रुग्णालयात उपचारवनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या परवानगीने सदर जखमी अजगरावर अमरावती येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात डॉ. विजय हटकर आणि डॉ. अनिल कळमकर यांनी उपचार केला. १७ दिवस राहिल्यानंतर पुन्हा या अजगराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पंचनाम्यानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

उन्हाळ्यात साप व इतर सरपटणारे प्राणी थंडावा व ओलाव्याच्या शोधात मानव वस्तीत आढळून येतात. अशा वेळी सापाला हानी न पोहोचवता ताबडतोब वनविभागाला किंवा वसा संस्थेला माहिती द्यावी. - भूषण सायंके, अ‍ॅनिमल्स रेस्क्यूअर, वसा संस्था)

टॅग्स :Amravatiअमरावती