चिखलदरा/ चुरणी : एका महाकाय अजगराने बकरीला जिवंत गिळल्याची घटना तालुक्यातील कोयलारी येथे बुधवारी रात्री ७.३० च्या सुमारास उघड झाली. यात बकरी जिवाने गेली, तर अजगराला जंगलात सुरक्षित सोडण्यात आले.कोयलारी येथील नर्सरीनजीकच्या धरणाजवळ शेळ्या व अन्य जनावरे चरत होत्या. यावेळी एका बकरीला अजगराने विळखा घातला. शेळी जिवाच्या आकांताने ओरडत असल्याने परिसरातील नागरिकांनी नर्सरीनजीक धाव घेतली. सर्पमित्र विजेंद्र धुर्वे, वनसमितीचे अध्यक्ष मंगलसिंह धुर्वे व इतर सदस्यांनी गुरुवारी त्या अजगराला कुठलीही इजा न करता जंगलात सोडले. गत आठवड्यात अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे शेतात निघालेल्या अजगराला ठार मारून झाडावर लटकविण्यात आले, तर दुसरीकडे मेळघाटातील आदिवासींनी अजगराला जिवंत पकडून जंगलात सोडल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
अजगराने घेतला शेळीचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:17 IST
एका महाकाय अजगराने बकरीला जिवंत गिळल्याची घटना तालुक्यातील कोयलारी येथे बुधवारी रात्री ७.३० च्या सुमारास उघड झाली. यात बकरी जिवाने गेली, तर अजगराला जंगलात सुरक्षित सोडण्यात आले.
अजगराने घेतला शेळीचा बळी
ठळक मुद्देकोयलारी येथील घटना