शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कुत्र्यांवर पायरो व्हायरस आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:01 IST

अमरावती शहरात पाळीव आणि मोकाट कुत्र्यांमध्ये चार ते पाच आठवड्यापासून पायरो व्हायरसचा संसर्ग दिसून आला आहे. शंभरपेक्षा अधिक कुत्री, तर जवळपास दहा बकऱ्यांमध्ये हे प्रमाण आहे. डायरिया, ओकारी, रक्ताची हगवण अशी लक्षणे यात दिसून येत आहेत. या आजारामुळे हे प्राणी काही खात नाहीत. आठ ते दहा दिवसांपर्यंत ही लक्षणे लागोपाठ दिसून येत आहेत . त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजाराने मृत्यू ओढवतो. हा संसर्ग कुत्र्यांपासून कुत्र्यांना होतो, माणसांना होत नाही, .....

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : अमरावती, नागपूर, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाळीव व मोकाट श्वानांवर पायरो व्हायरस आजाराचे संकट आले आहे. अमरावती शहरात दररोज शंभरावर श्वानांवर उपचार केले जात आहेत. रेबीज आणि पायरो व्हायरसचे लसीकरण करण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.अमरावती शहरात पाळीव आणि मोकाट कुत्र्यांमध्ये चार ते पाच आठवड्यापासून पायरो व्हायरसचा संसर्ग दिसून आला आहे. शंभरपेक्षा अधिक कुत्री, तर जवळपास दहा बकऱ्यांमध्ये हे प्रमाण आहे. डायरिया, ओकारी, रक्ताची हगवण अशी लक्षणे यात दिसून येत आहेत. या आजारामुळे हे प्राणी काही खात नाहीत. आठ ते दहा दिवसांपर्यंत ही लक्षणे लागोपाठ दिसून येत आहेत . त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजाराने मृत्यू ओढवतो. हा संसर्ग कुत्र्यांपासून कुत्र्यांना होतो, माणसांना होत नाही, असे मत  पशुधन विकास अधिकारी डी.एन. हटकर यांनी लोकमतला सांगितले. अमरावती शहरातील जिल्हा पशू सर्वचिकित्सालयात पायरो व्हायरसची लागण झालेले श्वान व शेळीवर उपचार केले जात आहेत. आठ ते दहा दिवस सलाईनने उपचार केला जात आहे. दररोज शंभरपेक्षा अधिक कुत्री गत चार ते पाच आठवड्यांपासून उपचाराकरिता आणली जात आहेत. 

रेबीज आणि पायरो व्हायरसचे व्हॅक्सिन जरुरीगावठी आणि पाळीव कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याची लागण होऊ नये, यासाठी रेबीज आणि पायरो व्हायरसचे व्हॅक्सिन लावणे गरजेचे आहे. तथापि, ७५० रुपयांपेक्षा अधिक किंमत असल्याने पशुपालकदेखील त्यांच्याकडील कुत्री, बकऱ्या या जनावरांना ही लस टोचून घेत नाहीत, याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. 

मुंबई, नागपूर, अमरावतीत लागण चार ते पाच आठवड्यांपासून मुंबई, नागपूर, अमरावती व राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पायरो व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात कुत्र्यांमध्ये झाली आहे. इतरही जिल्ह्यात संपर्क करून पशुधन विकास अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता ही बाब उघड झाली आहे. पावसाळा व हिवाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात हा संसर्ग या प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो.

शहरात दररोज शंभरावर पायरो व्हायरस झालेल्या श्वानांवर उपचार सुरू आहेत. नागपूर-मुंबई व इतरही जिल्ह्यांमध्ये हा आजार पसरला आहे. रेबीज आणि पायरो व्हायरससंबंधी लसीकरण करणे गरजेचे आहे. तथापि, एकाही जनावराचा या व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झालेला नाही. - डी.एन. हटकर, पशुधन विकास अधिकारी, अमरावती

 

टॅग्स :dogकुत्राHealthआरोग्य