शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतणखताचा ढिगारा इथून उचलला तेथे टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 21:53 IST

प्रशांतनगर नाल्यात अतिक्रमण करून अवैधरीत्या साठविलेला शेणखताचा अवाढव्य ढिगारा हटविण्याचा निव्वळ फार्स करण्यात आला. ज्या ठिकाणी शेणखताचा ढिगारा होता तेथून हटवून ते शेणखत नाल्याच्या अन्य भागात टाकण्यात आले.

ठळक मुद्देअनास्था : प्रशांतनगरमधील पशूव्यावसायिकाचे बांधकामही अनधिकृत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रशांतनगर नाल्यात अतिक्रमण करून अवैधरीत्या साठविलेला शेणखताचा अवाढव्य ढिगारा हटविण्याचा निव्वळ फार्स करण्यात आला. ज्या ठिकाणी शेणखताचा ढिगारा होता तेथून हटवून ते शेणखत नाल्याच्या अन्य भागात टाकण्यात आले. यात महापालिकेची दिशाभूल करण्यात आली. ‘प्रशांतनगर नाल्यात खताचा ढिगारा’ या ‘लोकमत’च्या वृत्ताने खडबडून उठलेल्या महापालिका प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर संबंधिताने नाल्यात साठविलेला खताचा ढिगारा हटविण्यासाठी जेसीबीचा वापर केला. तो ढिगारा काही प्रमाणात हटव्विण्यात आला. मात्र, तेथिल अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण हटविण्यास महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही.दुकानांसह गोठ्याचे ते बांधकाम अतिक्रमित असल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असताना अतिक्रमण निर्मुलन विभागाने त्याकडे केलेले दुर्लक्ष अर्थकारणाच्या शंकेला खतपाणी घालणारे ठरले आहे. अतिक्रमित बांधकाम पाडण्यात येईल, अशी माहिती अतिक्रमण निर्मुलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी ४ सप्टेंबरला ‘लोकमत’शी बोलताना दिली होती. महापालिकेचे पोलीस पथक गणेश विसर्जनासाठी आयुक्तालयाने माघारी बोलविल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले नाही.नोटीसनंतर ढिगारा उचलण्याची खानापूर्ती‘लोकमत’च्या वृत्तानंतर संबंधित स्वास्थ्य निरीक्षकाने नाल्यात शेणखताचा ढिगारा लावणाºया विनोद खंडारे यांना ढिगारा उचलण्यासंदर्भात ३ दिवसांची नोटीस बजावली होती.त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जेसीबी आणून तो काही प्रमाणात का होईना, हटविण्यात आला. ते शेणखत त्याच नाल्यात थोडे पुढे टाकल्याच तक्रार नव्याने नोंदविण्यात आली आहे. संबंधिताकडे १८ पेक्षा अधिक म्हशींचे शेणखत साठविण्यासाठी जागाच उपल्ब्ध नसल्याने खंडारे यांनी राजरोसपणे महापालिकेला आव्हान देत नाल्यात अतिक्रमण केले होते, हे विशेष.प्रशांतनगरात डेंग्यूचा फैलावअमरावती : प्रशांतनगर परिसरातील चार ते पाच नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती असून या डेंग्यूबाधित रूग्णांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात डेंग्यूमुळे नुकताच एका तरूणाचा बळी गेला आहे. पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साचून राहते. बहुतांश घरांवर पडून असलेल्या टाकाऊ वस्तू किंवा साहित्यात पाणी साचते. डेंग्युचे एडीज एजीप्त हे डास घराच्या आवारातच असल्यामुळे डेंग्युची लागण होण्याचे शक्यता अधिक असते.डेंग्युचा प्रसार शहरात वाढत आहे. चार रुग्ण प्रशांतनगरातील असून याभागात वेगाने फैलाव होत असल्याचे दिसत आहे. रूग्णांवर योग्य उपचार सुरु आहेत. खासगी रुग्णालयातही काही रुग्ण दाखल आहेत.- रोहन काळमेघ,ह्यदयरोग व मधुमेहतज्ज्ञ