शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

तूर खरेदीसाठी नांदगावात चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 00:03 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय तूर खरेदी केंद्रावर सकाळच्या सत्रात सुरू असलेली ....

वीरेंद्र जगताप आक्रमक : अखेर मोजणीला सुरूवात लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय तूर खरेदी केंद्रावर सकाळच्या सत्रात सुरू असलेली तूर खरेदी दुपारी १२ वाजता अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांचा रोष उफाळला आणि त्यांनी बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन सुरू केले. बाजार समितीत शेतकरी वेठीस धरले जात असल्याची माहिती मिळताच आ.वीरेंद्र जगताप यांनी देखील घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भर उन्हात बाजार समितीबाहेर ठिय्या दिला. हा प्रकार रविवारी घडला. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून पोलिसांनी मध्यस्थी केली. बाजार समिती सचिवांना आंदोलनस्थळी पाचारण करून मध्यम मार्ग काढण्यास बजावले असता त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून तूर मोजणी सुरू करण्याचे लेखी पत्र आमदारांना दिले. त्यानंतर तूर मोजणी सुरू झाली आणि हे आंदोलन निवळले. बारदान्याच्या अभावाचे कारण सांगून बाजार समितीत दुपारी १२ पासून अकस्मात तूर खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे जोपर्यंत तूर खरेदी सुरू होणार नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका आ. जगताप यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला . शेतकऱ्यांचा रोष, पोलिसांना पाचारण नांदगाव खंडेश्वर : शेकडो संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय तूर खरेदी केंद्रावर २२० शेतकऱ्यांच्या ४०७९ क्विंटल तुरीचे मोजमाप सुरू होते. परंतु रविवारी दुपारी १२ वाजता बारदानाचा अभाव असल्याचे कारण सांगून अचानक तूर खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश उफाळून आला. गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यातील शेकडो शेतकरी बाजार समितीचे उंबरठे झिजवत असताना बारदाना नसल्याचे सांगितल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी यंत्रणेला धारेवर धरले तथा या संपूर्ण प्रकरणाची माहिती आ.वीरेंद्र जगताप यांना दिली. बाजार समिती व्यवस्थापनाला बारदानाच्या स्टॉकची पूर्वकल्पना नव्हती काय, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांचा वाढत्या रोषामुळे बाजार समितीत मोठा गोंधळ निर्माण झाला. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. याप्रकाराबाबत आ.वीरेंद्र जगताप यांना माहिती मिळताच ते बाजार समितीत पोहोचले. झाल्या प्रकाराबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली व जोपर्यंत तूर मोजणी सुरू होत नाही, तोपर्यंत शेकडो शेतकऱ्यांसह रस्त्यावर ठाण मांडून बसण्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. असा आक्रमक पवित्रा आमदारांनी घेतला.यावेळी ठाणेदार रीता उईके यांनी यशस्वीरित्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. आंदोलनस्थळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल धवसे, विनोद चौधरी, मोरेश्वर वंजारी, विनोद तऱ्हेकर, सुनील गुल्हाने, नरेश ठाकरे, निरंजन रामटेके, सचिन ठाकरे, योगेश इंझळकर, रोशन ठाकरे, सरफराज, यांचेसह शेकडो शेतकरी चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकरी म्हणतात, आमचाबारदाना घ्या पण तूर मोजा !तूर मोजणीसाठी होणाऱ्या त्रासाला शेतकरी कंटाळले असून अनेक शेतकऱ्यांनी आमचा बारदाना घ्या आमचा पण आमची तूर मोजा, अशी गळ देखील बाजार समितीला घातली आहे. तूर मोजणीबाबत शेतकऱ्यांच्या अतिशय संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकार शेतकरीविरोधी आहे. सरकारचे तोंड उघडण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे नाक दाबावे लागेल. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही. - वीरेंद्र जगताप, आमदारव्यापाऱ्याची कर्मचाऱ्याला मारहाण वरूडमधील घटना : पोलिसांत तक्रार लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : स्थानिक बाजार समितीमध्ये तूर मोजणी दरम्यान कर्मचाऱ्याने व्यापाऱ्याकडे सातबाऱ्याची मागणी केली असता व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेसंदर्भात पोलिसांत तक्रार देण्यात आली असून संबंधित व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांची दादागिरी वाढली वरूड : स्थानिक बाजार समितीच्या आवारात हजारो क्विंटल तूर मोजणीअभावी पडून आहे. यातच व्यापाऱ्यांची दादागिरी वाढली आहे. रविवारी सकाळी ११ वाजता बाजार समिती कर्मचारी संजय झरबडे तुरीचे मोजमाप करीत असताना व्यापारी रामकिसन राठोड यांनी त्यांची तूर मोेजण्याची मागणी केली. कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून सातबारा मागितला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि राठोड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली व कार्यालयात जावून शिवीगाळ केली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्मचाऱ्याने बाजार समिती सचिव नंदकिशोर बोडखे यांच्यासह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. पोलिसांद्वारे पुढील कारवाई वृत्त लिहेस्तोवर सुरू होती. शेतकऱ्यांकडून अल्पदरात खरेदी केलेली तूर शासनाला जादा किमतीत विकण्याचा व्यापाऱ्यांचा गोरखधंदा परिसरात सुरू आहे. मात्र, बाजार समितीकडून सातबारा किंवा शेतकरी असल्याच्या पुराव्याशिवाय एका सातबाऱ्यावर ३० क्विंटल तुरीचीच खरेदी केली जात असल्याने व्यापाऱ्यांची गोची झाली आहे. यामुळे व्यापारी कर्मचाऱ्यांवर राग काढत असल्याची परिसरात चर्चा आहे.