शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत भिजलेल्या शेतमालाचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2022 05:00 IST

जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांकडून आवक झालेल्या शेतीमालाची हानी झाली. याची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतीमाल खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न राबवता शेडमध्ये राबविण्यात यावी. तसे न करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. यापुढे पावसाळ्यात खुल्या जागेत  खरेदी प्रक्रिया राबवता कामा नये. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास कुणाचीही गय करणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाचे शनिवारी पावसाने नुकसान झाले. त्याचे तत्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न घेता शेडमध्ये करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी बाजार समिती प्रशासकांना दिले.जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांकडून आवक झालेल्या शेतीमालाची हानी झाली. याची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतीमाल खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न राबवता शेडमध्ये राबविण्यात यावी. तसे न करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. यापुढे पावसाळ्यात खुल्या जागेत  खरेदी प्रक्रिया राबवता कामा नये. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास कुणाचीही गय करणार नाही. संपूर्ण मालाचे सविस्तर पंचनामे करावेत. ही प्रक्रिया गतीने राबवावी. प्रत्येक शेतकरी बांधवाला न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

भिजलेल्या मालाची खरेदी करण्याच्या अडत्यांना सूचना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आवक मालाची संपूर्ण खरेदी करण्यासाठी व्यापारी, अडते यांना बाजार समितीमार्फत सूचना देण्यात आली व बहुतांश खरेदी पूर्ण होईल, असा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार बहुतांश खरेदी पूर्ण झाली. यापुढे मालाची खरेदी प्रक्रिया शेडमध्ये राबविण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर यांनी सांगितले.

१४ कोटींचा विमा, त्यामधूनही भरपाई- संबंधितांना समितीमार्फत नोटिसाही जारी करण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार पंचनाम्याची प्रक्रियाही तत्काळ पूर्ण करण्यात येत आहे.- शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी बाजार समितीमार्फत १४ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. त्याद्वारेही भरपाई मिळवून देण्यात येईल, असे प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

 

टॅग्स :market yardमार्केट यार्डYashomati Thakurयशोमती ठाकूर