शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर भोपळा, नंतर २५ गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:04 IST

बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयाच्या उन्हाळी परीक्षा- २०१८ च्या निकालात एक-दोन नव्हे, तर २५ विद्यार्थी नापास झाले होते. मात्र, याच विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठात अर्ज सादर केले असता, जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. युवा सेनेने याप्रकरणी सोमवारी विद्यापीठावर धडक देत विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत देण्याची भूमिका घेतली. मात्र, कुलगुरू नसल्याने हे विद्यार्थी परतले.

ठळक मुद्देविद्यापीठाचा अजब कारभार : एमसीए द्वितीय वर्षातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयाच्या उन्हाळी परीक्षा- २०१८ च्या निकालात एक-दोन नव्हे, तर २५ विद्यार्थी नापास झाले होते. मात्र, याच विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठात अर्ज सादर केले असता, जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. युवा सेनेने याप्रकरणी सोमवारी विद्यापीठावर धडक देत विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत देण्याची भूमिका घेतली. मात्र, कुलगुरू नसल्याने हे विद्यार्थी परतले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा आॅनलाइन घेण्यात येत आहे. मात्र, या परीक्षेशी संबंधित ‘एन्ड टू एन्ड’ कामांची जबाबदारी असलेल्या ‘माइंड लॉजिक’ एजन्सीमुळे विद्यापीठावर नामुष्की ओढवली जात आहे. गेल्या वर्षभरापासून परीक्षा आणि वेळेपूर्वी निकालाचा गुंता सोडविला गेलेला नाही. अशातच विद्यापीठाने सुरू केलेल्या सेमिस्टर पॅटर्न परीक्षा निकालात असंख्य चुका, त्रुटी असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत.एमसीएचा विद्यार्थी श्रीकांत कोरडे याला द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयात अगोदर नऊ गुण मिळाले होते. त्याने पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केला होता. १२ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या आॅनलाइन निकालात आता ३० गुण मिळाले आहे. स्वप्निल जोगी या विद्यार्थ्यास सायलन्ट सर्व्हर कम्प्यूटिंग या विषयात भोपळा होता. पुर्नमूल्यांकनात चक्क २५ गुण मिळाले. रजत देशमुखला याच विषयात आधी सहा व पुनर्मूल्यांकनात २२ गुण देण्याची किमया झाली. स्वप्नील जोगी, अक्षय शिंदे, अक्षय चिंचोळकर, राजल मोरे, अक्षय ईखार, श्रीकांत कोरडे, संचित पाठक,ऋ षिका चव्हाण, शिवानी काळे, शुभम निमजे, भूमिका खंडेलवाल, दिव्यांनी कंकाळे, प्रतीक्षा म्हसंगे, पल्लवी खवशी आदी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गाठले होते.कुलसचिवांसोबत चर्चायुवा सेनेचे राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन निकालात असलेले दोष, त्रुटींबाबत कैफियत मांडली. मात्र, अगोदर नापास अन् पुनर्मूल्यांकनात पास याबाबत विद्यापीठ प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. कुलसचिव अजय देशमुख यांना परीक्षा विभागात सुरू असलेल्या अजब- गजब कारभाराची महिमा सांगण्यात आली. परीक्षेत पास असूनही आॅनलाइन निकालात नापास दर्शविल्याने विद्यार्थी हताश झाले आहेत. पुर्नमूल्यांकनासाठी आकारलेले शुल्क परत मिळण्यासाठी बहुतेकांनी धाव घेतली आहे.