शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघिणीचे पगमार्क आढळले; लाईव्ह लोकेशन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 16:55 IST

वन्यजीव विभागाचे अधिकारी तळ ठोकून; मचानीवरून ‘टी-१’ चा दुर्बिणीने शोध सुरू

अमरावती : राळेगाव, पांढरकवडा परिसरातील जंगलात नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र अद्यापही त्यांनी यश आलेले नाही. आता वन विभागाला नरभक्षक वाघिणीचे पगमार्क आढळले असून, त्याआधारे मचानीवरून तिचा शोध घेतला जात आहे. वाघिणीचे लाईव्ह लोकेशन मिळत नसल्याने ‘टी-१’ मिशनवर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राळेगाव तालुक्यातील सराटी जंगलात नरभक्षक वाघिणीने १३ जणांचा  बळी घेतला. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी १२ सप्टेंबर २०१८ पासून  वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी ए.के. मिश्रा, सुनील लिमये यांच्यासह प्रचंड मोठा फौजफाटा जंगलात तळ ठोकून आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने वन्यजीव विभागाने अनेक उपाययोजना केल्यात. परंतु, नरभक्षक वाघिणीचे लाईव्ह लोकेशन अद्यापही मिळाले नाही. राळेगावच्या विस्तीर्ण जंगलात असलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात नरभक्षक वाघिणीचे पगमार्क कैद झाले आहे. या पगमार्कच्या आधारे वाघिणीचा पाठलाग केला जात आहे. जंगलात काही महत्त्वाच्या ठिकाणी मचानी निर्माण करण्यात आल्या असून, त्यावरुन वन कर्मचारी दुर्बिणीद्वारे वाघिणीचा शोध घेत आहेत. गत काही दिवसांपूर्वी ‘टी-१’ मिशन यशस्वीतेसाठी मध्यप्रदेशातून चार तर ताडोबा येथून एक असे पाच हत्ती जंगलात सोडण्यात आले होते. मात्र, ३ ऑक्टोबर रोजी ताडोबा येथील ‘गजराज’अचानक नियंत्रणाबाहेर झाला. त्याने चहांद व पोहणा येथे धुडगूस घातला. यात अर्चना कुळसंगे या महिलेचा बळी गेला. तर एक वृद्ध महिला जखमी झाली. याशिवाय गावातही मोठे नुकसान झाले. अखेर वन विभागाने नियंत्रणाबाहेर गेलेल्या हत्तीला राष्ट्रीय महामार्गावर जेरबंद केले. त्यानंतर हे पाचही हत्ती परत पाठविले आहे. यानंतर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सूर्योदय ते सूर्यास्त अशी मोहीम चालवण्यात आली. मात्र असे असताना वन्यजीव विभागाला कोणतेही यश मिळाले नाही. वाघिणीला जेरबंद करणे मोठे आव्हान असल्यामुळे पुन्हा हैद्राबाद येथून शूटर नवाबला बोलाविण्याचा हालचाली सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. 

२५ दिवसानंतरही ‘त्या’ वाघिणीचे दर्शन नाही१३ जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी राळेगाव, पांढरकवडा परिसरातील जंगलात वन्यजीव विभाग तळ ठोकून आहे. १२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान २५ दिवसांच्या कालावधीत तिचे ‘लाईव्ह लोकेशन’ मिळाले नाही. त्यामुळे आता मचानीचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी जंगलात मचानीवरून अद्ययावत दुर्बिणीद्वारे नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जात आहे. 

नरभक्षक वाघिणीला सुखरूप जेरबंद करायचे आहे. त्याकरिता वन्यजीव विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. जंगलात काही महत्त्वाच्या ठिकाणी मचानी तयार करण्यात आल्या असून, दुर्बिणद्वारे तिचा शोध घेतला जात आहे. अद्यापही लाइव्ह लोकेशन मिळाले नाही.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग. 

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती