शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

भाजप समर्थकच करणार विरोधात प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:34 IST

मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या समर्थकांना चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत डावलण्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या बैठकीत न बोलविल्याने राजकुमार पटेल समर्थक प्रचंड संतापले.

ठळक मुद्देखळबळ : दानवेंच्या बैठकीत मेळघाटच्या राजकुमार पटेलांना डावलले

आॅनलाईन लोकमतचिखलदरा : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या समर्थकांना चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत डावलण्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या बैठकीत न बोलविल्याने राजकुमार पटेल समर्थक प्रचंड संतापले. पालिकेविरुद्ध काम करण्याचा निर्धार त्यांनी केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. जि.प. निवडणुकीत मेळघाटात भाजपला पराभव पत्करावा लागल्याने राजकुमार पटेलांना भाजपमध्ये येण्यासाठी मनधरणी करण्यात आली होती. त्यानंतर धारणी पंचायत समिती निवडणूक लागल्याने पटेल यांच्या नेतृत्त्वात दहाही जागांवर भाजपने यश मिळविले, हे विशेष.पालिकेत समर्थकांचे तिकीट कापले१३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत राजकुमार पटेल यांच्या समर्थकांचे नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी भाजपने उमेदवारी नाकारल्याने राजकुमार पटेलसह समर्थक प्रचंड संतापले असून त्यांनी शुक्रवारी भाजपविरोधी काम करण्याचे जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. परिणामी पालिकेत आमने-सामने असलेल्या भाजप-काँग्रेसच्या तुल्यबळ लढतीमध्ये राजकुमार समर्थक विरोधात काम करणार असल्याने त्याचा फायदा काँगे्रस व अपक्ष उमेदवारांना होणार असल्याचे स्पष्ट झाले.दानवेंच्या बैठकीचे निमंत्रण नाहीभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी अमरावती येथे पक्षातील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक घेतली. मात्र, बैठकीचे निमंत्रण राजकुमार पटेल यांना मिळालेच नाही. परिणामी पटेल दिवसभर धारणीत कार्यकर्त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यांना हेतुपुरस्सर डावलल्याचा आरोप समर्थकांनी केला असून येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारीसुद्धा त्यांना मिळू नये, यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहेभाजप प्रदेशाध्यक्ष बैठकीचे निमंत्रण मिळाले नाही. चिखलदरा पालिका निवडणुकीत समर्थकांना डावलले. याचा अर्थ धारणी पंचायत समितीसाठीच आपला उपयोग घेतला. विधानसभेसाठी आपली आवश्यकता नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे विरोधात प्रचार करू.- राजकुमार पटेल, माजी आमदार, मेळघाट