शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी ‘गॅस बॉम्ब’चा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:25 IST

फुग्याच्या गॅस सिलिंडर स्फोटाने हादरलेल्या राजकमल चौकातील घटनेनंतर आता सार्वजनिक ठिकाणचे ‘गॅस बॉम्ब’ अमरावतीकरांसाठी धोकादायक ठरत आहेत. शुक्रवारी दुपारी नवाथे नगर चौकात एका हातगाडीवर सिलिंडरचा भडका उडाला. सुदैवाने हानी झाली नाही, मात्र, सार्वजनिक ठिकाणावरील ‘गॅस बॉम्ब’चा धोका कायम असल्याचे ही घटना अधोरेखित करीत आहे.

ठळक मुद्देनवाथे चौकात सिलिंडरचा भडका : सुरक्षिततेची जबाबदारी कुणाची?

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फुग्याच्या गॅस सिलिंडर स्फोटाने हादरलेल्या राजकमल चौकातील घटनेनंतर आता सार्वजनिक ठिकाणचे ‘गॅस बॉम्ब’ अमरावतीकरांसाठी धोकादायक ठरत आहेत. शुक्रवारी दुपारी नवाथे नगर चौकात एका हातगाडीवर सिलिंडरचा भडका उडाला. सुदैवाने हानी झाली नाही, मात्र, सार्वजनिक ठिकाणावरील ‘गॅस बॉम्ब’चा धोका कायम असल्याचे ही घटना अधोरेखित करीत आहे.सार्वजनिक ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी शेकडोंच्या संख्येने हातगाड्यांवर गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. मात्र, हातगाडी चालक गॅस सिलिंडरच्या सुरक्षेविषयी नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. नेमकी हीच बाब नागरिकांसाठी जिवघेणी ठरू शकते. राजकमल चौकात फुग्याच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. दोन जण जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेनंतर शहरातून आता गॅस भरणारे फुगेवाले दिसेनासे झाले आहेत. मात्र, आता परवानगीने चालणाऱ्या ‘गॅस बॉम्ब’ अर्थात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हजारो हातगाड्यांवर तयार करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर केला जाते. मात्र, त्याच्या सुरक्षेविषयी कोणत्याही नियमावली पाळली जात नाही.एकाही हातगाडीवर अग्निरोधी साहित्य नाहीसार्वजनिक ठिकाणी आग लागल्यास फायर एक्सटिंग्यूशर आदी अग्निरोधी साहित्याने आग नियंत्रणात येऊ शकते. मात्र, तशी सोय कोणतेही हातगाडीचालक करीत नाही. शहरातील एकाही हातगाडीवर अग्निरोधी साहित्य नसल्याचे दिसून येत आहे.घरगुती गॅस सिलिंडरचाही वापरशहरातील अनेक हातगाड्यांवर घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर अनेकदा पोलीस कारवाईचा बडगासुद्धा उगारला गेला आहे. मात्र, तरीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा वापर सुरूच आहे.गॅस सिलिंडरच्या सुरक्षेविषयीची जबाबदारी संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाºयांची असते. त्यांनीच गॅस सिलिंडरच्या सुरक्षेविषयी मोहीम राबविणे आवश्यक आहे.- भरतसिंग चव्हाणअधीक्षकआमच्याकडे गॅस सिलिंडरच्या ब्लॅक मार्केटिंगविषयी तक्रार आल्यास कारवाईची रुपरेषा ठरते. गॅस सिलिंडरच्या सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित कंपनीच्या वितरकांची आहे.- अनिल टाकसाळेजिल्हा पुरवठा अधिकारीआम्ही गॅस सिलिंडर तपासूनच देतो. ते वापरताना हातगाडी चालकांनी सुरक्षेवर लक्ष द्यायला हवे. गॅस नळी, लिकेज, शेगडी आदी व्यवस्थित आहे किंवा नाही, याची शहानिशा करावी. याशिवाय अग्निरोधक ठेवणे आवश्यक आहे.- संजय देशमुखअध्यक्ष, अमरावती गॅस डिस्ट्रिब्यूटर