शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हरीना समिती करणार नेत्रदानासाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:04 IST

नेत्रदान व अवयवदान हे अनमोल दान असून, अवयवदान केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतात.

ठळक मुद्देचंद्रकांत पोपट मुख्य संयोजक : समितीची घोषणा

आॅनलाईन लोकमतअमरावती : नेत्रदान व अवयवदान हे अनमोल दान असून, अवयवदान केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतात. नेत्रदानाने अनेकांना दृष्टी मिळू शकते. अवयवदान व नेत्रदान नागरिकांनी मूत्यूनंतर नागरिकांनी करावे, याबाबत जनजागृतीसाठी हरीना नेत्रदान समितीची स्थापना करण्यात आली आहे. शुक्रवारी आयोजीत पत्रपरिषदेमध्ये संयोजन समितीचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रकांत पोपट यांना मुख्य संयोजन करण्यात आले आहे.पत्रपरिषदेला जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्यासह हरीना अवयदान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत अमरावतीतून १३०० जणांनी नेत्रदान केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. ज्या रुग्णांचे ब्रेनडेड झाले आहे, त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णाचे अवयवदान केल्यास पाच जणांना नवजीवन दिले जाऊ शकते. त्यामुळे अवयवदान व नेत्रदान करणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावेळी सांगितले.हरीना नेत्रदान समितीचे अध्यक्षपदी मनोज राठी, तर सचिव अमित चांडक आहेत. मुख्य संयोजनक म्हणून चंद्रकांत पोपट,यांच्या नावाची घोेषणा नावाची घोषणा केली. सदस्य ओमप्रकाश खेमचंदनी, सुरेश जैन, ओमप्रकाश चांडक, पप्पु गगलानी, जयप्रकाश पुरसवाणी, सुरेश वसाणी, आहेत. २०१८ करिता हरीना नेत्रदान संयोजन समितीमध्ये मुख्य संयोजक सुनील मंत्री, सदस्य रामप्रकाश गिल्डा, शरद कासट, सीमेश श्रॉफ, अशोक दुल्हानी, संजय भुतडा, प्रशांत राठी यांची निवड करण्यात आली आहे. ट्रस्टने महापालिकेकडे जागेची मागणी केली आहे.जागा मिळाल्यानंतर नेत्रदान शस्त्रक्रिया करण्यासाठी एक हॉस्पिटल उभारण्याचा समितीचा मानस असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. समितीशी अधिकाधि लोकांना जुळण्याचे आवाहन करण्यात आले.