शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआय सासऱ्याने केला जावयाचा खून

By admin | Updated: September 13, 2016 00:12 IST

मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या पीएसआय सासऱ्याने जावयाची गळा दाबून हत्या केली व मृतदेह जाळला.

सचिन सिमोलियाची हत्याच : प्रेमविवाह होता नापसंतअमरावती : मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या पीएसआय सासऱ्याने जावयाची गळा दाबून हत्या केली व मृतदेह जाळला. ही धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. सचिन सिमोलिया असे मृताचे, तर तुकाराम ढोके, असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात चार महिन्यांपूर्वी नोंदविण्यात आली होती. या घटनेचे गूढ आता बाहेर आले असून मुलीच्या माहेरच्या मंडळीनीच सचिनची हत्या केल्याचे पोलीस चौकशी उघड झाले आहे. ‘सैराट’ या बहुचर्चित चित्रपटाशी साधर्म्य साधणारी ही घटना अंगाचा थरकाप उडविणारी आहे. वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भयंकर प्रकार घडला. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी पाच जणांविरूद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. पोलीस सूत्रांनुसार, येथील संजय गांधी नगरातील रहिवासी सचिन सिमोलीया या तरूणाने कारंजा लाड येथील रहिवासी शिवानी तुकाराम ढोके हिच्याशी १ एप्रिल २०१६ रोजी आर्य समाज मंदिरात प्रेमविवाह केला. या विवाहाला मुलीचे वडील आसेगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ढोके यांचा विरोध होता. कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघांचाही संसार सुरू असताना २५ मे रोजीला शिवानीला फोन आला आणि तिला माहेरी बोलविण्यात आले. त्यामुळे सचिन व शिवानी हे दोघेही कारंजा लाड येथे गेले. मात्र, तेव्हापासून सचिन पुन्हा घरी परतला नाही. त्यामुळे ३१ मे रोजी सचिनच्या कुटंबीयांनी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. याप्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सचिनची आई सविता सिमोलिया यांनी केला होता. चार महिने उलटूनही सचिनचा शोध लागला नव्हता. त्यामुळे त्याच्या आईने अनेकदा पोलिसांचे उंबरठे झिजविले.मृतदेहाचे अवशेष प्रयोगशाळेतअमरावती : त्या स्वत: वाशिम येथे ढोके यांच्या घरी सचिनबद्दल विचारपूस करण्याकरिता जाऊन आल्या. मात्र, तरीही सचिनचा पत्ता लागला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या सचिनच्या आईने रिपाइंच्या माध्यमातून आंदोलन छेडले. आंदोलनामुळे पोलिसांच्या तपासाला वेग आला. पोलीस उपायुक्त शशिकुमार मिना यांनी या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश इंगळेंकडे सोपविला. त्यांनी सायबर लॅबचे एपीआय कांचन पांडे यांच्या मदतीने सचिनचे मोबाईल लोकेशन घेतले. त्यामध्ये २५ मे रोजी सचिन हा पुसद येथे गेल्याचे आढळून आले. मात्र, त्यानंतर त्याचा मोबाईल बंद आढळून आला. त्याच्या मोबाईलवर सर्वात शेवटी त्याचे सासरे तुकाराम ढोके यांनी संपर्क केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार फे्रजरपुरा पोलिसांनी तुकाराम ढोके यांना विचारपूस करण्याकरिता बोलाविण्याचे ठरविले. याच दरम्यान २५ मे रोजी मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोखळी युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतहेद आढळून आला. त्यासंदर्भात इंगळे यांनी मानोरा ठाण्याचे तपास अधिकारी डाखोरे यांची भेट घेऊन घटनाक्रम जाणून घेतला. घटनास्थळी मृताजवळ तुटलेले मंगळसूत्र, काही मणी व १ चांदीची बदाम ठप्पा असलेली अंगठी सापडली. त्यामध्ये सचिनने घातलेल्या ब्रासलेटचे मणी असल्याचेही पोलिसांना आढळून आले. मात्र, मृतदेह हा ९० टक्के जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. परिणामी मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सीक लॅबला तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. या संशयावरून पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ढोके व त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली असता आरोपी तुकाराम ढोके याने गुन्ह्याची कबुली दिली. मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याच्या रागात सचिनची गळा दाबून हत्या केली आणि पऱ्हाटीच्या गंजीवर मृतदेह जाळून टाकल्याचे बयाण तुकाराम ढोके याने पोलिसांना दिले.या हत्येत तुकाराम ढोकेचा मुलगा तुषार ढोके, भाचा प्रवीण आगलावे यांनी मदत केली. याप्रकाराबाबत शिवानी व पुण्याबाई तुकाराम ढोके यांना माहिती होती. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी पाच आरोपींविरूद्ध भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंदविला असून तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना फे्रजरपुरा पोलिसांनी मानोरा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांची यशस्वी कामागिरीसचिन सिमोलियाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या अत्यंत किचकट तपासात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व पोलीस उपायुक्त शशिकुमार मिना यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश इंगळे, सायबर सेलचे एपीआय कांचन पांडे, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम भोजने, मनीष गवळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे, तुकाराम देवकर, निबोरकर यांनी यशस्वी कामगिरी बजावली. सचिनच्या आईचा पोलीस आयुक्तालयात आक्रोशसचिन हरविल्याची तक्रार त्याच्या आईने ३१ मे रोजी केली होती. त्यानुसार फे्रजरपुरा पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. मात्र, चार महिने उलटूनही सचिनचा शोध न लागल्याने त्याच्या आईच्या मनात भीती निर्माण झाली होती. पोलिसांनीच चौकशीत विलंब लावल्याचा आरोप करीत सचिनच्या नातेवाईकांनी आंदोलन छेडले होते. मात्र, सोमवारी सचिनची हत्या झाल्याचे उघड होताच त्याची आई सविता सिमोलिया यांना मोठा धक्का बसला. त्यांनी नातेवाईकांसह पोलीस आयुक्तांकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली. यावेळी पोलिसांनी सचिनच्या नातेवाईकांना प्रवेशद्वारासमोरच अडविले असता नातेवाईकांनी पीआय आत्राम यांच्यावर रोष व्यक्त केला. त्यानंतर सचिनच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा व पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांना निलंबित करून गुन्हे नोंदवा, अशी मागणी केली. सीपींनी चौकशी पूर्ण करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले